द पॉईंट प्रतिनिधी : शहापूर तालुक्यातील मोहिली -अघई येथील विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचलित कोकमठाण आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलात परमपूज्य सद्गुरू आत्मा मालिक माऊलीच्या कृपा आशीर्वादाने व संत परिवारच्या प्रेरणेने विश्वस्त मंडळ तसेच आत्मा मालिक ध्यानपिठाचे कार्याध्यक्ष तथा विश्वस्त उमेश जाधव साहेबाच्या मार्गदर्शनाखाली व स्थानिक व्यवस्थापन समिती शाखा-शहापूर यांच्या अथक परिश्रमाने ७५वा स्वातंत्र्य दिन संकुलातील प्रांगणात सोशल डिस्टंसिग व सर्व शासकीय नियम पाळून साजरा करण्यात आला.
यावेळी संकुलाच्या प्रांगणात IEEE Bombay Sectionचे पदाधिकारी डॉ.बी सत्यनारायण अध्यक्ष,डॉ किरण तलीले कोषाध्यक्ष, डॉ सौरभ मेहता सचिव, डॉ आरती करंडे सदस्य , यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.यावेळी स्थानिक व्यवस्थापन समिती विश्वस्त अनंत गायकवाड,संत भारतमाता कार्यक्रमसाठी उपस्थिती होत्या तसेच कार्यक्रमासाठी व्यवस्थापक ,प्राचार्य शिक्षक इतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.स्वातंत्र्य दिनाचे ओचित्य साधत यावेळी विविध उपक्रम राबविल्याबद्दल विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे भरभरून कौतुक केले.
विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर निबंध लेखन ,वक्तृत्व स्पर्धा या ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आल्या तसेच शाळेच्या विद्यार्थ्यांनी आप-आपल्या घराच्या परिसरात वृक्षरोपण केल्याचे व निबंध लेखनाची छायाचित्रे पाठवली.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम
आपलया भारता तील झाडे वाडवलि तर भुकप होनार नाहि .