द पॉईंट नाऊ ब्युरो : कार आणि दुचाकीच्या अपघातात एका अडीच वर्षांच्या चिमुकल्याला आपला जीव गमवावा लागल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्याच्या धावडवाडी जवळ नुकताच हा दुर्दैवी अपघात घडला.
याबाबत अधिक माहिती अशी की, साजिद महान नालसाब शेख आणि जबिन शेख हे दाम्पत्य धावडवाडी गावात दुचाकीवरून आलेले होते. त्यात हे गाव राष्ट्रीय महामार्गालागत येत असल्याने, इथे वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. हे दाम्पत्य आपल्या लहानग्या अडीच वर्षाच्या चिमुकल्याला घेऊन काम आटोपून परतत असताना, इंडिका कारने त्यांना जोरदार धडक दिली. यात दोन्ही पती-पत्नी खाली कोसळले. तर अडीच वर्षांचा हा चिमुकला अब्दुल हमद शेख कारच्या हेडलाईट मध्ये अडकल्याचे लक्षात न आल्याने कारचालक महादेव मधुकर कुंडले याने त्याला 7 किलोमीटरपर्यंत फरफटत नेले. यात त्या चिमुकल्याचा दुर्दैवी वेदनादायक मृत्यू झाला.
दरम्यान, दोन्हीही पती-पत्नी गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या भयानक अपघाताने आत्ता कुठे आयुष्य सुरू झालेल्या त्या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम