आता ही जीवनावश्यक बाब देखील महागणार..

0
40

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी  ;  सामान्यांना आता अजून एक झटका बसणार आहे. आता देशभरात विजेचे दर देखील वाढणार आहेत.

सध्या कोळश्याच्या निर्माण झालेल्या तुटवड्याने वीज निर्मिती संदर्भात मोठे संकट उभे राहिले आहे. त्यामुळे वीज वितरण कंपन्यांना आता जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत.

देशभरात सध्या महागाईने कळस गाठला आहे. ज्यात इंधन दर तर अस्मानाला भिडले आहेत. तर इतर ही अनेक जीवनावश्यक वस्तू यांचे दर वाढले आहेत.

यामुळे सामान्य जनता पुरती मेटाकुटीला आली आहे. रोजच्या वाढलेल्या खर्चाने, सामान्यांचे बजेट कोलमडले आहे.

आधीच कोरोनामुळे बऱ्याच जणांचे वेतन कमी झाले आहे. बऱ्याच लोकांच्या नोकऱ्या गेल्यात.

अशात आता एका मागून एक गोष्टी महाग होत चालल्याने, सामान्यांना हा वीज महाग होण्याचा अजून एक झटका आहे.

ऑटोमॅटिक पास थ्रू मॉडेल मुळे जागतिक बाजारात इंधनाच्या किंमती वाढल्या आहेत.

ज्यामुळे वीज पुरवठा करणाऱ्या कंपन्यांना साहजिकच जास्तीचे पैसे मोजावे लागतील.

वितरण कंपन्यांना अधिक चे पैसे मोजावे लागले, म्हणजे विजेचे दर वाढतील. आणि याचा मोठा फटका सामान्य जनतेला बसणार आहे.

कोरोना या महामारीने संपूर्ण जगाला झटका बसला आहे. ज्यामुळे संपूर्ण जगाचीच अर्थ व्यवस्था कोलमडली आहे.

ज्याचे परिणाम जागतिक बाजार पेठेत दिसून येत आहे. आणि एका मागे एक गोष्टींच्या किंमती जागतिक बाजार पेठेत वाढत आहेत.

जागतिक बाजार पेठेत दर वाढत असल्याने, देशभरात देखील याचा परिणाम दिसून येत आहे. आधी पेट्रोल – डिझेल ने शंभरी गाठली. खाद्य तेलाचे दर वाढले.

आणि आता अजून एक जीवनावश्यक भाग अर्थात, विजेचे देखील दर वाढणार आहेत.

म्हणून आता सामान्यांना वीज देखील जपून वापरावी लागणार आहे. विजेचा अपव्यय टाळावा लागणार आहे.

दिवसा गणिक विजेची मागणी वाढत चालली आहे. ज्यामुळे वीज निर्मिती वाढतेय. आणि वीज निर्मिती साठी लागणाऱ्या इंधनाचे दर इंधनाच्या तुटवड्या मुळे वाढत आहेत.

याचा परिणाम वीज वितरण कंपन्यांना अधिक दर देऊन वीज खरेदी करावी लागणार आहे. ज्यामुळे साहजिकच विजेचे दर वाढणार आहेत.

म्हणून आता विजेचा अपव्यय टाळणे, हाच एक चांगला पर्याय सामान्यांसमोर राहिला आहे.

आधी कोरोनाच्या काळात वीज वितरण कंपन्यांकडून अधिकची बिले वसूल करण्यात आल्याचा अनेक तक्रारी आल्या होत्या.

आणि आता तर विजेचे दरच वाढणार असल्याने, सामान्यांच्या खिशाला अजून झटका बसणार आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here