द पॉईंट नाऊ ब्युरो ; तालिबानने आता अजून एक अन्याय कारक फतवा काढला आहे.
अफगाणिस्तान (Afghanistan) मध्ये तालिबान (Taliban) ने शासन स्थापन केल्या पासून, तिथल्या नागरिकांना सतत काही ना काही अन्याय कारक फतव्याला तोंड द्यावे लागत आहे.
त्यात महिला (Ladies) वर्गा साठी तर तालिबान चे फतवे अतिशय कठोर आणि अन्याय कारक आहेत.
आता तालिबान ने, महिला कलाकार (Actress) असलेल्या सर्व प्रकारच्या कार्यक्रमांवर बंदी घातली आहे.
तालिबान द्वारे अफगाणिस्तान मध्ये सत्ता स्थापन केल्या पासून, तिथे काही ना काही विपरीत घडतच आहे.
त्यामुळे तालिबान चा हा नवीन फतवा महिला वर्गाचे स्वातंत्र्य आता पूर्णतः हिरावले गेल्याचे च द्योतक आहे, असे म्हणावे लागेल.
तालिबान ने अफगाणिस्तान मध्ये शरियत कायदा लागू केला आहे. ज्यात सर्वाधिक कठोर निर्बंधांना महिला वर्गास सामोरे जावे लागत आहे.
तालिबान द्वारे आधी महिला वर्गाची वस्त्रे, महिला वर्गाचे शिक्षण, महिला वर्गाचे घरा बाहेर पडणे या सर्वांवर अनेक निर्बंध घालण्यात आलेत.
महिला वर्गाला इथे बुरखा घालणे अनिवार्य आहे, तर शरीर दिसेल असे कपडे घालण्यावर बंदी आहे.
महिलांना शिक्षणास देखील मज्जाव करण्यात आला.
आता महिला कलाकार असलेल्या सर्व प्रकारच्या टीव्ही कार्यक्रमांवर तालिबान ने बंदी घातली आहे.
यामुळे आता महिला कलाकारांना कोणत्याही प्रकारच्या कार्यक्रमात काम करणे देखील, बंद करावे लागणार आहे.
तालिबान ची अफगाणिस्तान मध्ये सत्ता स्थापन झाल्यापासून, महिला वर्गाचे स्वातंत्र्य पूर्णतः हिरावले गेले आहे.
या आधी महिलांनी शरीर दिसणारे कपडे परिधान करायचे नाहीत, महिलांनी बुरखा परिधान करणे, घरा बाहेर पडताना सोबत कोणीतरी घरातील पुरुष असावा, चालताना आवाज करून चालू नये असे अनेक अन्याय कारक फतवे काढले.
तालिबान ने महिला खेळाडूंना देखील खेळण्यास बंदी घातली आहे.
या अशा अनेक निर्णयांनी तालिबान ने महिला वर्गाचे स्वातंत्र्य पूर्णतः हिरावून घेतले आहे.
तालिबान ची अफगाणिस्तान मध्ये सत्ता स्थापन झाल्यापासून, इथे अफगाण नागरिकांना मोठ्या अन्यायाला सामोरे जावे लागत आहे. इथे सतत कुठे ना कुठे हल्ल्याच्या घटना घडत आहेत.
यामुळे आत्ता पर्यंत मोठ्या प्रमाणावर अफगाण नागरिकांनी इथून पलायन केले आहे.
महिला वर्गावर होत असलेल्या एक ना अनेक बंदी अतिशय अन्याय कारक आहेत. ज्यामुळे जगभरात याची निंदा केली जात आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम
Hii iam Harshad