महाराष्ट्राची चिंता वाढली ; आढळला ओमीक्रॉनचा रुग्ण

0
40

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी  ;  ओमीक्रॉनचा रुग्ण महाराष्ट्रात सापडला आहे. त्यामुळे आता चिंता वाढली आहे.

ओमीक्रॉन या कोरोनाच्या प्रकारचे कर्नाटक मध्ये दोन रुग्ण सापडल्यानंतर केंद्र शासन यंत्रणा सजग झाली.

आता ओमीक्रॉनचा भारतात देखील प्रसार व्हायला सुरुवात झाली आहे. भारतात ही ओमीक्रॉनची एन्ट्री परदेशातून देशात दाखल झालेल्या प्रवासी नागरिकांद्वारेच झाली आहे. त्यामुळे प्रशासनाला आता अधिक सजग व्हावे लागणार आहे.

आधी कर्नाटक, गुजरात आणि आता महाराष्ट्रात देखील ओमीक्रॉनचा रूग्ण सापडला असल्याने, नागरिकांनी देखील आता काळजी घेणे आवश्यक आहे.

महाराष्ट्रात डोंबिवली येथील हा ओमीक्रॉनचा रुग्ण आहे. आणि महत्वाची आणि लक्ष देण्याची बाब ही की, या रुग्णाने कोरोनाच्या लसीचा एकही डोस घेतला नसल्याचे सांगण्यात येत आहे.

कोरोनाच्या लस घेण्यासंदर्भात शासन वारंवार जनजागृती करत आहे. मात्र अजूनही मोठ्या प्रमाणावर नागरिक लस घेण्याबाबत उदासीन आहेत. मात्र आता महाराष्ट्रात सापडलेला ओमीक्रॉनचा रुग्ण एकही लसीचा डोस न घेतल्याने स्पष्ट झाले आहे.

नागरिकांनी यावरून बोध घेत, आता तरी लस घेण्यात दिरंगाई करू नये. आणि त्वरित कोरोनाची लस घ्यावी असं आवाहन करण्यात येत आहे.

ओमीक्रॉनने जगभरात चिंता वाढवली आहे. आत्ता पर्यंत जगभरात 30 हुन अधिक देशांत ओमीक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हॅरिएंट चा प्रसार झाला आहे. आणि या नव्या व्हॅरिएंटचा प्रसार वेगाने होऊ लागला आहे.

कोरोनाचा ओमीक्रॉन या नव्या व्हॅरिएंटने बाधित एक रुग्ण 30 हुन अधिक लोकांना संक्रमित करू शकतो. असं सांगण्यात येत आहे.

त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचं कारण नाही. असं शासन जरी म्हणत असलं, तरी काळजी घेणं मात्र तितकंच आवश्यक आहे.

या नव्या व्हॅरिएंट बाबत WHO जगभरातील परिस्थितीवर नजर ठेवून आहे. WHO ने सर्वांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

हा नवा व्हॅरिएंट पसरू लागला आहे. महाराष्ट्रात नागरिकांना निर्बंध पाळण्यास सांगण्यात आले आहे. मात्र राजकीय नेते मंडळींच्या खाजगी कार्यक्रमांमध्ये कोणत्याही प्रकारचे बंधन पाळताना मात्र दिसत नाही आहे. असेच होत राहिले तर कोरोनाला अटकाव कसा करणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

आत्ता कुठे शाळा, धार्मिक स्थळे सुरू झाली असतांना, या नव्या व्हॅरिएंट मुळे डोके दुःखी वाढली आहे.

हा नवा व्हॅरिएंट असाच वाढत राहिला तर पुन्हा निर्बंध लादले तर नाही जाणार ना. अशी शंका उपस्थित केली जात आहे. त्यामुळे आता नागरिकांनीच याबाबत काळजी घेणे गरजेचे आहे.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here