आता ‘जावाद’ चक्रीवादळाचा धोका ; शेतकऱ्यांची चिंता वाढली

0
19

द पॉईंट नाऊ ब्युरो : दोन दिवसांपासून पावसाने झोडपले असून शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. हे कमी म्हणून की काय आता चक्रीवादळाची भर त्यात पडली आहे. आंध्र प्रदेश आणि ओडिशामध्ये ‘जावाद’ चक्रीवादळाचा धोका निर्माण (Heavy rains expected) झाला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, जवाद चक्रीवादळ शनिवारी सकाळपर्यंत आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारी भागात धडकू शकते. यामुळे हवामान खात्याने 3 डिसेंबरपासून ओडिशातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी जरी केला आहे.

केंद्रीय हवामान खात्याने दिलेल्या माहिती नुसार , दक्षिण ओडिशाच्या जिल्ह्यांमध्ये 3 डिसेंबरला मुसळधार पाऊस पडू शकतो. या वादळामुळे प्रचंड नुकसान होऊ शकते, रस्त्यांवर पाणी साचण्याची, रस्त्यांवरील दृश्यमानता कमी होईल, लोकांनी विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे असे आवाहन हवामान खात्याने केले आहे.

महाराष्ट्र गुजरातला धोका…
चक्रीवादळाचा फटका हा महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये बसू शकतो जोरदार वारे व पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सागरी वाऱ्यांचा जोर वाढल्याने लाटांची उंची वाढण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. 40 ते 50 किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील आणि काही भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. गुजरातमध्ये बुधवार आणि गुरुवारी दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून सखल भागातून जनावरे हलवली जात आहेत. यामुळे शेतकऱ्यांनी खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका ओडिशाच्या या जिल्ह्यांना बसेल

चक्रीवादळ किनारपट्टी ओलांडल्यानंतरच त्याचे स्थान आणि तीव्रतेचा अंदाज बांधता येईल, असे हवामान खात्याच्या अधिकाऱ्याने सांगितले. हवामान खात्याने म्हटले आहे की ओडिशातील पावसाची तीव्रता शनिवारपासून वाढेल कारण किनारपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये आणि अंतर्गत जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने गजपती, गंजम, पुरी आणि जगतसिंगपूर जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. केंद्रपारा, कटक, खुर्दा, नयागड, कंधमाल, रायगडा आणि कोरापुट जिल्ह्यात शनिवारी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

वादळ शनिवारपर्यंत आंध्र आणि ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकणार
हवामान खात्याने सांगितले की, चक्रीवादळाचा कमी दाब आता अंदमान समुद्रात कायम आहे. यानंतर ते पश्चिम-वायव्य दिशेकडे सरकून आग्नेय आणि बंगालच्या उपसागराच्या लगतच्या मध्य भागात ३ डिसेंबरला पोहोचण्याची शक्यता आहे. यानंतर शनिवारी 4 डिसेंबरला सकाळी उत्तर आंध्र प्रदेश-ओडिशा किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. त्याचवेळी, या कमी दाबामुळे ओडिशाच्या किनारी भागात जोरदार ते खूप जोरदार आणि अति मुसळधार पावसाची शक्यता आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here