द पॉईंट नाऊ ब्युरो : राज ठाकरेंनी राज्य सरकारला मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी 3 मे चा अल्टीमेटम दिला आहे. औरंगाबाद (संभाजीनगर) येथे राज ठाकरेंची सभा सुरू आहे. आणि आता इथे सभेत राज ठाकरेंनी राज्य सरकारला अल्टीमेटमची आठवण करून देत पुन्हा इशारा दिला आहे. 3 तारखेपर्यंत मशिदींवरील भोंगे उतरले नाहीत, 4 तारखेला दोन हात होऊन जाऊद्या असा इशारा राज ठाकरेंनी दिला आहे.
उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आदेशानंतर अनेक ठिकाणी भोंगे उतरवण्यात आले. याचा दाखला देतांना, उत्तर प्रदेशात भोंगे उतरवले जाऊ शकतात, तर माझ्या महाराष्ट्रात का नाही? असा सवाल केला आहे.
दरम्यान, राज ठाकरे यांनी शरद पवारांवर निशाणा साधतांना पवारांनीच महाराष्ट्रात जातीवादाचे विष कालवल्याचा आरोप केला आहे. शरद पवार हे नास्तिक असल्याचे राज ठाकरे यांनी म्हणत शरद पवारांवर निशाणा साधला.
3 तारखेला ईद आहे. मला तुमच्या सणात विष कालवायचे नाही. असे म्हणत 4 तारखेला मशिदींवरील भोंगे उतरवलेच पाहिजेत असा राज ठाकरेंनी इशारा दिला आहे. भोंगे उतरले नाहीत, तर त्याच्या दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लागतील असे राज ठाकरेंनी म्हटले आहे. मला महाराष्ट्रात कुठेही दंगली घडवायच्या नाहीत. मी फक्त भोंग्यांना हनुमान चालीसेचा पर्याय दिला. असे राज ठाकरे म्हणाले. तर भोंग्यांचा त्रास हा मुस्लिम समाजातील नागरिकांना देखील होतो, असे देखील राज ठाकरे म्हणाले.
दरम्यान, राज ठाकरे हे भाजपच्या इशाऱ्यावर चालत आहेत. भाजपच्या सांगण्यावरूनच राज ठाकरेंनी भोंग्यांचा मुद्दा काढला. ते समाजाला भरकटवण्याचं काम करत आहेत. अशी टीका AIMIM पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे. तर महाराष्ट्रात मुस्लिम विरोधी वातावरण तयार केले जात असल्याची टीका AIMIM पक्षाचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी केली आहे.
दरम्यान, औरंगाबाद (संभाजीनगर) येथे सभा सुरू असताना, भोंग्यावरील सुरू झालेला अजान थांबवण्याची विनंती राज ठाकरेंनी पोलिसांना या सभेदरम्यान केली. सर्वांचे या सभेकडे लक्ष लागले होते. त्यात राज ठाकरेंनी पुन्हा सरकारला पुन्हा भोंग्यांबाबत इशारा दिला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम