आठवण एका पर्वाची – “बाळासाहेब ठाकरे”..

0
43

द पॉईंट नाऊ विशेष  ;  बाळासाहेब ठाकरे…!!!!!
या एका नावातच सारं काही आलं..
दुसरं काही स्पष्टीकरण द्यायची, आवश्यकता देखील नाही..

अर्थात, हे नाव फक्त महाराष्ट्रात नव्हे, तर संपूर्ण जगभरात एक वेगळा ठसा उमटवून गेलेले आहे..

‘हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे’ असं त्यांचं नाव आज प्रत्येकाच्या मुखातून आदराने घेतलं जातं..

हिंदुत्वाच्या मुद्द्याला बाळासाहेबांनी नेहमीच महत्व दिले. परंतु, कधी इतर जाती-धर्माच्या लोकांना कमी लेखले नाही. प्रत्येक जाती-धर्माचा माणूस बाळासाहेबांनी आपल्या कार्याने आपलासा केलेला होता.

बाळासाहेब ठाकरे म्हणजे दरारा.. बाळासाहेब ठाकरे म्हणजे मराठी माणसाचं हृदय.. अशा अनेक प्रकारे बाळासाहेब ठाकरे यांचा आदर्श आज साऱ्या जगा समोर आहे..

आज हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन.. आज एका पर्वाला जाऊन 9 वर्ष सरलेत..

एक व्यंग चित्रकार म्हणून बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या जीवनाचा प्रारंभ केला. 1960 मध्ये त्यांनी आपल्या ‘मार्मिक’ या सप्ताहिकास सुरुवात करून, मराठी माणसावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यास प्रारंभ केला.

1966 मध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी ‘शिवसेना या आपल्या संघटनेस प्रारंभ केला. याच संघटनेच्या कार्यकर्त्यांना ‘शिवसैनिक’ म्हणून संबोधले जाऊ लागले आणि आज ही संबोधले जाते.

तेव्हा ही आणि आजही शिवसेना म्हटले की, मराठी असो अथवा कुणी दिन-दुबळा कोणावरही अन्याय करणाऱ्याला घाम फुटतो.

महाराष्ट्रात बाळासाहेबांनी मराठी माणसांना एकत्र करण्यासाठी एक चळवळ उभी केली. तर मुंबई ला महाराष्ट्राची राजधानी बनवण्याच्या मोहिमेत त्यांनी, महत्वाची भूमिका बजावली.

बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या ‘शिवसेना’ या संघटनेच्या माध्यमातून मराठी माणसावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली. मराठी माणसाच्या हक्कांसाठी त्यांनी एक मोहीम च सुरू केली.

त्यांच्या या मोहिमेत त्यांना असंख्य युवा पिढी येऊन मिळाली. त्यांनी पुढे भारतीय जनता पक्ष या पक्षा सोबत एकत्र येत, महाराष्ट्रात सरकार स्थापन केले.

मात्र त्यांनी राजकारणात आपल्या संघटनेला उतरवल्या नंतर देखील, 20% राजकारण आणि 80% समाजकारण हेच समीकरण सदैव ठेवण्याचा पायंडा आपल्या ‘शिवसेना’ या संघटनेत पाडला.

प्रबोधनकार यांचे सुपुत्र म्हणून पुढे आलेले बाळासाहेब ठाकरे यांनी, आपल्या कार्य कर्तृत्वाने सबंध महाराष्ट्रात एक चिरकाल कार्यशैली प्रकट करत, तरुणाईला, मराठी माणसाला एक आवाज दिला.

अनेक प्रकारची संकटं, राजकीय अडथळे, अनेक वेळा अटक असे अनेक संकट त्यांना थोडं देखील डगमगवू शकले नाहीत.

बाळासाहेब आपल्या बिनधास्त व्यक्तिमत्वामुळे सर्वांच्या परिचयाचे झाले होते. कोणत्याही प्रकारच्या संकटाला न जुमानता ते थेट जाऊन भिडले.

नुकत्याच घडलेल्या महाराष्ट्रातील दंगल सदृश परिस्थितीने बाळासाहेब ठाकरे यांची आठवण करुन दिली.

शिवसेनेच्या आजच्या अग्रलेखात, थेटपणे रझा अकादमी आणि नकली हिंदुत्ववाद्यांवर निशाणा साधत, बाळासाहेबांची आठवण काढली.

आज बाळासाहेब ठाकरे असते, तर कधी कोणाची महाराष्ट्र पेटवण्याची हिंमत झाली नसती. असे स्पष्ट मत सामना च्या अग्रलेखात मांडण्यात आले आहे.

आणि हे सत्य देखील आहे. बाळासाहेब ठाकरे हे केवळ नावच पुरेसे होते, अशा प्रकारे खोट्या बतावण्या करून महाराष्ट्राच्या शांततेस भंग करणाऱ्यांसाठी.

आजच्याच दिवशी 9 वर्षांपूर्वी हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी अखेरचा श्वास घेतला. आणि एका पर्वाचा अंत झाला.

‘द पॉईंट नाऊ’ परिवारातर्फे माननीय बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन….!!!!


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here