द पॉईंट नाऊ ब्युरो : आजपासून शाळा सुरू केल्या जाणार आहेत. याबाबत पालकांची संमती घेऊनच हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
मेस्टा या संघटनेशी संलग्न इंग्लिश मेडिअम शाळा सुरू केल्या जाणार आहेत. मेस्टा अर्थात ‘महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन’शी जवळपास अठरा हजार शाळा संलग्न आहेत. या सर्व शाळा आता सुरू केल्या जाणार आहेत. पालकांचे संमतीपत्र घेऊनच या शाळा सुरू करण्याची तयारी संस्था चालकांनी दर्शविली आहे.
महाराष्ट्रात शाळा बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पालकांसह अनेकांनी नाराजी दर्शविली होती. शाळा पुन्हा सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यात आता मेस्टा संघटनेने आपल्या इंग्लिश मेडिअम शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम
Real nirnay