आजचे राशी भविष्य 5 एप्रिल – मंगळवार

0
28

मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today: अडचणीतून भाग्य उजळेल. वास्तवाचे भान बाळगा, गोंधळ होत असल्यास मन शांत ठेवून ज्येष्ठांचा सल्ला घ्या आणि विचार करुन निर्णय घ्या. दिवस छान जाईल. शुभ रंग – नारिंगी

वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope Today: महत्त्वाचे निर्णय पुढे ढकला, कायद्याचे पालन करा. तब्येत सांभाळा. भावनांवर नियंत्रण ठेवा. शुभ रंग – निळा.

मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope Today: वरिष्ठांशी संबंध सुधारतील. अडचणीतून मार्ग निघेल. जुने प्रश्न सुटतील. तोडगा निघेल. महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी चांगला दिवस आहे. शुभ रंग – मोरपिशी.

कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope Today: वेळेचा सदुपयोग करा. विचारपूर्वक निर्णय घ्या. डोकं शांत ठेवून व्यावहारिक विचार करा. घरातील सदस्यांच्या तब्येतीची काळजी घ्या. स्वतःला जपा. शुभ रंग – चंदेरी

सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope Today: आर्थिक स्थिती चांगली राहील. महत्त्वाचे प्रश्न सुटतील. दिवस चांगला जाईल. शक्य असल्यास प्रवास टाळा. शुभ रंग – किरमिजी

कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope Today: चांगल्या माणसांची साथ लाभेल. वरिष्ठांच्या सल्ल्याने काम करा. गोड बोलायला शिका फायदा होईल. शुभ रंग – पोपटी

तूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope Today: नैतिक आचरण चांगले ठेवा. विचारी आणि व्यावहारिक असल्यामुळे वेळ निभावून न्याल. दिवस छान जाईल. अनावश्यक प्रवास टाळा आणि तब्येत सांभाळा. शुभ रंग – आकाशी

वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope Today: आश्वासन देण्यापेक्षा कृतीवर भर द्यावा. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले हे लक्षात ठेवा. सत्यवचनी राहावे. तब्येतीची काळजी घ्या. वडीलधाऱ्यांची काळजी घ्यावी . शुभ रंग – आकाशी

धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today: विचारपूर्वक केलेली गुंतवणूक फायद्याची ठरेल. पैसा जपून वापरा. वायफळ खर्च टाळा. तब्येतीची काळजी घ्या. दिवस चांगला जाईल. शुभ रंग – पिवळा

मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope Today: ज्येष्ठांच्या सल्ल्याने वागणे हिताचे आहे. कौटुंबिक स्वास्थ्य जपण्याला महत्त्व द्या. आवडीच्या लोकांशी भेटी झाल्याने दिवस मजेत जाईल शुभ रंग – सोनेरी आणि पिवळा

कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today: घरच्यांना वेळ द्या. अडचण जाणवल्यास मोकळेपणाने संवाद साधा. मार्ग सापडेल. वाद टाळा आणि चर्चेतून प्रश्न सोडवा. भावनिक नको व्यावहारिक व्हा. शुभ रंग – तपकिरी

मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope Today: जपून खर्च करा. तब्येतीची काळजी घ्या. घरातल्यांना वेळ द्या. दिवस चांगला जाईल. शुभ रंग – राखाडी


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here