मेष राशी भविष्य / Aries Horoscope Today: क्रोधावर नियंत्रण ठेवा. कोणतेही निर्णय घाईघाईने घेऊ नका. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांना खुश करण्याचा प्रयत्न कराल. दाम्पत्य जीवनात जोडीदाराच्या आरोग्याची काळजी सतावेल. पोटाचे विकार संभवण्याची शक्यता आहे. शुभ रंग – राखाडी.
वृषभ राशी भविष्य / Tauras Horoscope Today: व्यापारात मोठी प्रगती होईल. अनेक लाभ होतील. हातात पैसा खेळता राहील. आरोग्याची विशेष काळजी घ्या. आबालवृद्ध तसेच आजारी व्यक्तींनी काळजी घेणे गरजेचे आहे. एखाद्या वादात पडू नका. शुभ रंग – जांभळा.
मिथुन राशी भविष्य / Gemini Horoscope Today: व्यवसायाशी संबंधित लोक आपले ध्येय पूर्ण करू शकतील. जोडीदारसंबंधित तणावाचे वातावरण निर्माण होऊ शकते. आरोग्य चांगले राहील. शुभ रंग – पांढरा.
कर्क राशी भविष्य / Cancer Horoscope Today: एखाद्या कामामध्ये तुम्ही दिवसभर व्यस्त असाल. प्रसन्नता वाढवणारा दिवस असेल. धन आगमनाची शक्यता आहे. लव्ह लाईफ चांगली असेल. दाम्पत्य जीवनात रागावर नियंत्रण ठेवा. शुभ रंग – पिवळा.
सिंह राशी भविष्य / Leo Horoscope Today: विद्यार्थी त्यांच्या कामात यशस्वी ठरतील. राजकीय व्यक्ती यशस्वी ठरतील. लव्ह लाईफमध्ये विवाहाचा प्रस्ताव ठेवाल. श्वसनाचे विकार उद्भवू शकतात. धन आगमन होईल. आरोग्याच्या तक्रारी संभवू शकतात. शुभ रंग – निळा
कन्या राशी भविष्य / Virgo Horoscope Today: व्यवसायात मोठे यश मिळेल. मीडिया तसेच आयटीशी संबंधित व्यक्ती आपल्या कामाने संतुष्ट असतील. विद्यार्थ्यांना नव्या संधी उपलब्ध होतील. दिवस तुमच्यासाठी प्रसन्नता वाढवणारा असेल. आरोग्याच्या तक्रारी संभवू शकतात. शुभ रंग – लाल.
तूळ राशी भविष्य / Libra Horoscope Today: अनेक समस्यांचे निराकरण होईल. धन आगमन होईल. लव्ह लाईफ चांगली राहील. व्यवसायात नव्या संधी उपलब्ध होतील. शुभ रंग – हिरवा.
वृश्चिक राशी भविष्य / Scorpio Horoscope Today: राजकीय क्षेत्रातील व्यक्तींच्या लोकांना लाभ होऊ शकतात. नोकरीत यश मिळेल. दाम्पत्य जीवनात सुखी समाधान असेल. धन आगमनाने मन प्रसन्न होईल. बीपीचा त्रास असलेल्या लोकांनी सावधानता बाळगा. शुभ रंग – आकाशी.
धनु राशी भविष्य / Sagittarius Horoscope Today: निर्णय घेताना काळजी घ्या. विचारपूर्वक निर्णय घ्या. तुम्ही धार्मिक कार्यात व्यस्त राहाल. राजकीय व्यक्तींना विशेष लाभ होतील. लव्ह लाईफ चांगली राहील. शुभ रंग – तांबडा.
मकर राशी भविष्य / Capricorn Horoscope Today: तुमच्यासाठी धावपळीचा दिवस आहे. एखाद्या नव्या व्यवसायाबाबत योजना आखाल. दाम्पत्य जीवनात आनंदीआनंद राहील. शुभ रंग – पांढरा.
कुंभ राशी भविष्य / Aquarius Horoscope Today: एखादा प्रश्न चर्चेने सोडवाल. व्यवसायात उत्पन्नाचे नवे स्त्रोत निर्माण होतील. तुमचा मूड सतत बदलत राहील. अवाजवी खर्च टाळा. तुमच्या कामाने वरिष्ठ प्रसन्न होतील. शुभ रंग – लाल.
मीन राशी भविष्य / Pisces Horoscope Today: मीडिया तसेच आयटी क्षेत्रातील व्यक्तींना हा दिवस यशदायी ठरणार आहे. राजकारणात या व्यक्ती आपल्या उच्च नेत्यांना कामाने खुश करतील. वैवाहिक जीवनात प्रेम वाढेल. आरोग्य चांगले राहील. शुभ रंग – हिरवा.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम