आजचे राशी भविष्य 11- एप्रिल

0
32

मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today: एखाद्या कामाचे पैसे बऱ्याच दिवसांनंतर आता मिळण्याची शक्यता आहे. मित्रांच्या भेटीगाठी होतील. कामात प्रगती होईल. आरोग्याची समस्या जाणवू शकते. शुभ रंग – पांढरा.

वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope Today: कामात चांगली प्रगती कराल. विद्यार्थ्यांना चांगले यश प्राप्त होईल. धनलाभ होण्याची शक्यता आहे. जोडीदाराची चांगली साथ मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. शुभ रंग- हिरवा.

मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope Today: व्यवसायात एखाद्या व्यक्तीला पैसे देताना सावधानता बाळगा. प्रलंबित काम पूर्ण होईल, धनलाभ होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक आयुष्य आनंदी असेल. आरोग्य चांगले असेल. शुभ रंग – निळा.

कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope Today: दिवस तुमच्यासाठी संघर्षाचा असेल. लेखन आणि सिनेक्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींसाठी दिवस चांगला जाईल. वायफळ खर्च टाळण्याचा प्रयत्न करा. शुभ रंग – पिवळा.

सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope Today: विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात चांगले यश प्राप्त होईल. मीडिया, आयटी आणि बँकिंग क्षेत्रातील व्यक्ती आपलं काम वेळेआधी पूर्ण करतील. आरोग्याची काळजी घ्या. शुभ रंग – पांढरा.

कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope Today: एखादी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात नव्या संधी उपलब्ध होतील. विद्यार्थी चांगली प्रगती करतील. प्रेमी जोडप्यात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. शुभ रंग – हिरवा.

तूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope Today: व्यवसायात चांगलं यश प्राप्त होईल. बँकिंग क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना चांगले यश मिळेल. शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना चांगली बातमी मिळेल. कौटुंबिक आयुष्य आनंदमय असेल. आनंदाची बातमी मिळेल. शुभ रंग – निळा.

वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope Today: विद्यार्थ्यांना चांगलं यश प्राप्त होईल. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना वरिष्ठांचे आशीर्वाद मिळतील. बाहेरील खाद्य-पदार्थ खाणं टाळा. शुभ रंग – पिवळा.

धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today: गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेलं काम पूर्ण होईल. आयटी तसेच मीडिया क्षेत्रातील व्यक्तींना अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. शुभ रंग – केशरी.

मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope Today: विद्यार्थ्यांना एखादा निर्णय घेण्यात अडचणी येण्याची शक्यता आहे. ऑफिसमधील कामं बऱ्याच मेहनतीनंतर पूर्ण होतील. वाद विवाद टाळा. शुभ रंग – निळा.

कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today: राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींसाठी दिवस खूपच चांगला असेल. धनलाभ होण्याची शक्यता आहे. व्यवसायात चांगला नफा होण्याची शक्यता आहे. शुभ रंग – निळा.

मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope Today: विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात नव्या संधी उपलब्ध होतील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. आरोग्याची काळजी घ्या. शुभ रंग – लाल.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here