आजचे राशी भविष्य शुक्रवार – 8 एप्रिल

0
46

मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today: आजचा दिवस चांगला जाईल. घरच्यांना वेळ द्याल. खर्च वाढेल. वेळेचे आणि आर्थिक बाबींचे नियोजन करणे हिताचे. व्याप वाढवणे टाळा. शुभ रंग – लाल

वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope Today: आजचा दिवस चांगला जाईल. यश मिळाले तरी नम्रतेने त्यात इतरांना सामावून घ्या. आनंद एकत्र राहून साजरा करा. ‘जिभेची गोडी आनंद आणी’ हे लक्षात ठेवा. शुभ रंग – निळा

मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope Today: आजचा दिवस प्रगतीचा आहे. नवे कौशल्य शिका, आत्मनिर्भर बना. प्रगती कराल. यशस्वी व्हाल. यश डोक्यात जाऊ देऊ नका. व्यावहारिक निर्णय घ्या. शुभ रंग – हिरवा.

कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope Today: आजचा दिवस बरा जाईल. व्यावहारिक निर्णय घ्या. आपण बरे आपले काम बरे असेच राहा. नवी जबाबदारी घेणे टाळा. शुभ रंग – चंदेरी

सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope Today: आजचा दिवस चांगला जाईल. प्रामाणिक प्रयत्न करा, यश मिळेल. सातत्यावर भर द्या. कायदा पाळा. तब्येत जपा. शुभ रंग – नारिंगी

कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope Today: आजचा दिवस चांगला जाईल. करार विचारपूर्वक करा. व्यवहार जपून करा. कायदा पाळा. तब्येत जपा. आर्थिक बाबी आणि वेळेचे नियोजन हिताचे. शुभ रंग – पोपटी

तूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope Today: आजचा दिवस छान जाईल. कृती महत्त्वाची आहे. प्रयत्नांमध्ये सातत्य असल्यास यश मिळेल. प्रामाणिक राहा. शुभ रंग – निळा

वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope Today: आजचा दिवस चांगला जाईल. बोलताना संयम राखा. गोड बोलून काम पूर्ण करुन घ्याल. प्रयत्न करुन अडचणी सोडवाल. शुभ रंग – लाल

धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today: आजचा दिवस चांगला जाईल. नव्या वाटा नव्या दिशा शोधा. प्रयत्न करा, यश मिळवा. व्यावहारिक राहा. तब्येत सांभाळा. शुभ रंग – निळा

मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope Today: आजचा दिवस चांगला जाईल. कुणाला कमी लेखू नका. गोड बोला, वाद टाळा. व्यावहारिक निर्णय हिताचे. सामंजस्य लाभाचे आहे. शुभ रंग – राखाडी

कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today: आजचा दिवस बरा आहे. नम्रता महत्त्वाची. यश मिळाले तरी नम्रतेने त्यात इतरांना सामावून घ्या. आनंद एकत्र राहून साजरा करा. शुभ रंग – काळा

मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope Today: आजचा दिवस बरा आहे. चिंता सोडा. आला दिवस मजेत जगा. कायदा पाळा. घरच्यांना वेळ द्या. संवादातून मार्ग काढा. संयम पाळा. जपून शब्द वापरा. शुभ रंग – सोनेरी


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here