आजचे राशी भविष्य रविवार – 17 एप्रिल

0
34

मेष राशी भविष्य / Aries Horoscope: ऊर्जेचा सकारात्मक वापर लाभ मिळवून देईल. लेखनकार्य फायद्याचे ठरेल. वाणी, संयम आणि कृतीवर भर दिल्यास प्रगती होईल. शुभ रंग – पांढरा

वृषभ राशी भविष्य / Tauras Horoscope: दक्षता घ्यावयास हवी. गोड बोलुन कार्यभाग साधण्याचे धोरण स्विकारावे. झेपतील अशाच जबाबदाऱ्या स्विकारा. थोडे हिशोबी राहणे आवश्यक आहे. शुभ रंग – आकाशी

मिथुन राशी भविष्य / Gemini Horoscope: वेळ पाहून बोलणे आणि योग्य वेळी संधी साधणे हिताचे ठरेल. जबाबदारीने काम केल्यास फायदा होईल. नियोजन लाभाचे आहे. शुभ रंग – निळा

कर्क राशी भविष्य / Cancer Horoscope: प्रयत्नांमधील सातत्य यश मिळवून देईल. आर्थिक नियोजनावर भर देणे हिताचे. शुभ रंग – सोनेरी

सिंह राशी भविष्य / Leo Horoscope: आर्थिक नियोजन हिताचे. कोणतीही कृती विचारपूर्वक आणि आवश्यक ती चौकशी करुनच करा. शुभ रंग – जांभळा

कन्या राशी भविष्य / Virgo Horoscope: परिस्थितीशी जुळवून घेणे लाभाचे. घरच्यांना वेळ द्याल. चर्चेतून मार्ग काढाल. शुभ रंग – नारिंगी

तूळ राशी भविष्य / Libra Horoscope: शब्द, वेळ आणि पैसा यांचे नियोजन अत्यावश्यक आहे. परिस्थितीशी जुळवून घेणे लाभाचे आहे. प्रयत्नांमध्ये सातत्य राखा. शुभ रंग – हिरवा

वृश्चिक राशी भविष्य / Scorpio Horoscope: जबाबदाऱ्या सांभाळूनच धाडस करा. कार्यात सातत्य राखल्यास आत्मविश्वास वाढेल. व्यवहार करताना सावधानता बाळगावयास हवी. शुभ रंग – तपकिरी

धनु राशी भविष्य / Sagittarius Horoscope: ज्येष्ठांचा आदर करा. चर्चेतून तोडगा सापडेल. जाणत्यांचे सल्ले लाभदायी ठरतील. रखडलेली कामं पूर्ण होतील. शुभ रंग – पोपटी

मकर राशी भविष्य / Capricorn Horoscope: तब्येत सांभाळा. शब्द, पैसा आणि वेळ यांचे नियोजन फायद्याचे ठरेल. शुभ रंग – पिवळा

कुंभ राशी भविष्य / Aquarius Horoscope: जाणत्यांचा सल्ला हिताचा आहे. चर्चेने प्रश्न सोडवू शकाल. शब्द जपून वापरा. शुभ रंग – गुलाबी

मीन राशी भविष्य / Pisces Horoscope: प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवल्यास यश मिळेल. ओळखीतल्यांचे सहकार्य लाभेल. गृहसौख्य लाभेल. जवळच्यांना वेळ देणे आवश्यक आहे. शुभ रंग – किरमिजी


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here