(राशी भविष्य हे आम्ही वाचकांच्या आग्रहास्तव सुरू केले असून, ज्योतिष अमोल भट (मुंबई) हे आम्हाला ज्योतिष माहिती पुरवत असतात, दिलेलं भविष्य तंतोतंत खरे असेलच असे नाही)
मेष : (चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) कामात विलंब, कामे रेंगाळतील, जेष्ठ लोकांशी वाद होऊ शकतात. सरकारी मान सन्मान मिळेल. मन अस्वस्थ असेल.
वृषभ : (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) उत्तम आर्थिक लाभाचा दिवस आहे. दीर्घकालीन फायदा होईल. मन प्रसन्न राहील. जुने मित्रांशी बोलणे होईल
मिथुन : (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) संमिश्र दिवस आहे. सार्वजनिक कामात वेळ व्यतीत कराल. जोडीदाराशी किंवा शेजाऱ्यांशी वाद संभवतात. शक्यतो वाद टाळावेत.
कर्क : (हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) स्वप्नपूर्तीकडे वाटचाल, नात्यातून लाभ होतील. अचानक धनलाभ होईल. प्रतिष्ठा वाढेल.
सिंह:– (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) आरोग्य सांभाळा. विश्रांती घ्या. महत्वाचे करार आज नकोत. वाहन जपून चालवा. अशुभ घटना ऐकायला येईल.
कन्या : (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) घरात सबुरीने घ्या. भागीदारी व्यवसायात लक्ष द्या. जोडीदाराला समजून घ्या. विनाकारण चिडचिड होऊ शकते.
तुळ : (रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) उत्तम आर्थिक लाभाचा दिवस आहे. वेळेचे नियोजन करा. संधीचे सोने करा. लाभदायक दिवस.
वृश्चिक : (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) संमिश्र ग्रहमान आहे. फारसा लाभदायक दिवस नाही. अपत्यांशी संवाद साधा. देवाच्या मंदिरात जाऊन वेळ घालवा.
धनु : (ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) कौटुंबिक सुख लाभेल. प्रलोभने टाळा. मौल्यवान खरेदी आज नको. कपटी मित्रांपासून दूर थांबा.
मकर : (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) शुभ घटना घडणार, सुखाचा दिवस असेल. मनासारखी कामे होतील. संधी चालून येतील. शनिदेवाला नमस्कार करा.
कुंभ : (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) खर्चात वाढ होणार आहे. शब्दास मान मिळेल. आश्वासन देताना जपून द्या. कौटुंबिक वादाची शक्यता.
मीन : (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) समाधान लाभेल. आत्मविश्वास वाढेल. आध्यत्मिक उन्नती होईल. प्रगतीचे पाऊल टाकाल.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम