आजचा दिवस कसा जाणार वाचा राशी भविष्य

0
12

मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today: व्यवसायात प्रगतीसाठी अधिक परिश्रमाची अपेक्षा आहे. सरकारी कामे लवकरच मार्गी लागतील. रखडलेले काम पूर्ण होईल. वरिष्ठांच्या सहकार्याने मोठा लाभ होईल. शुभ रंग – पांढरा.

वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope Today: अपेक्षित कार्यामध्ये विलंब होईल. चिंता तसेच तणाव राहील. घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका. नोकरीमध्ये अधिकारी अधिक कामाची अपेक्षा करतील. बोलताना जपून शब्द वापरा. शुभ रंग – पिवळा.

मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope Today: बनवलेल्या योजनेचे फळ तुमच्या हाती लागेल. कामामध्ये सुधारणा होईल. दुसऱ्यांची मदत करू शकाल. भाग्याची साथ राहील. काम पूर्ण झाल्याने प्रसन्न रहाल. नवी कामे मिळतील. शुभ रंग – पांढरा.

कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope Today: व्यवसायात चांगला लाभ होईल. राजकीय व्यक्तींचा सहवास लाभेल. व्यापार तसेच व्यवसायात प्रगती होईल. घरात लवकरच धार्मिक कार्य होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. शुभ रंग – पिवळा.

सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope Today: वाहन चालवताना काळजी घ्या. घाईघाईने घेतलेल्या निर्णयामुळे तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते. देण्या-घेण्याच्या व्यवहारात काळजी घ्या. शुभ रंग – निळा.

कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope Today: जोडीदाराकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. व्यापार तसेच व्यवसायात लाभ होतील. नोकरीमध्ये अधिकारी वर्ग तुमच्यावर खूश असेल. कोणत्याही प्रकारच्या वादात पडू नका. शुभ रंग – हिरवा.

तूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope Today: प्रगतीचे मार्ग खुले होतील. स्थायी संपत्तीची कामे मोठे लाभ मिळवून देऊ शकतात. व्यवसायात वृद्धी होईल. वेळेचा फायदा करून घ्या. शुभ रंग – लाल.

वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope Today: आवडत्या खाद्यपदार्थांचा आनंद लुटाल. बौद्धिक कार्यात सफल व्हाल. व्यापारात चांगले यश मिळेल. रखडलेले काम पूर्ण होईल. मकर राशीच्या व्यक्तींकडून कामात सहकार्य मिळेल. शुभ रंग – पांढरा.

धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today: प्रयत्न यशस्वी ठरतील. जोडीदाराबाबत चिंता राहील. मित्रांकडून सहकार्य मिळेल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. मोठे काम करण्याची इच्छा जागृत होईल. व्यापार-व्यवसाय चांगला राहील. नोकरीत नवे काम हाती घ्याल. शुभ रंग – पिवळा.

मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope Today: विद्यार्थ्यांचे अभ्यासात मन रमेल. नवे वाहन खरेदी करू शकता. मनोरंजनाच्या साधनांवर खर्च होईल. एकटेपणा वाटू शकतो. गुंतवणुकीतून लाभ मिळेल. शुभ रंग – जांभळा.

कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today: बेरोजगारांना नोकरी मिळण्याच्या संधी आहे. व्यापारात लाभ होतील. आपल्या बोलण्यावर संयम ठेवा. मित्रांसोबत वेळ घालवाल. नव्या संपर्कातून लाभ होतील. शुभ रंग – निळा.

मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope Today: राजकारणात यश प्राप्त होईल. गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. गरीबांना अन्न दान करा. शुभ रंग – पिवळा.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here