आगीत लाखों रुपयांचे नुकसान ; 17 ट्रॉली चाऱ्याची राख

0
27

स्वप्निल आहिरे,
द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : बागलाण तालुक्यातील आराई गावा लगत ठेंगोडा शिवारात गट नंबर ४७३/३ मध्ये एकनाथ रामभाऊ अहिरे यांच्या मळ्यात सतरा ट्रॉली मक्याचा चारा ठेवलेला असताना अचानक लागलेल्या आगीत सर्व चारा भस्मसात झाला.

अचानक लागलेल्या आगीमुळे आग विझवण्यासाठी नागरिकांची तारांबळ उडाली होती. सर्व चारा जळाल्यामुळे आजच जनावरांसाठी चारा नसल्याने मोठं संकट त्यांच्यावर ओढवले आहे. शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी लगेच घटनास्थळी धाव घेत अग्निशामक दलाला पाचारण केले. सगळीकडे कांदा लागवडीचे काम सुरू असल्याने शेतकरी कामात व्यस्त असल्यामुळे मदत कार्यात अडचणी निर्माण झाल्या. मदत उपलब्ध होण्याच्या आतच आगीने रौद्ररूप घेऊन चाऱ्याचे होत्याचे नव्हते केले. अग्निशामक पोहोचेपर्यंत खूप उशीर झाला होता. तरीही स्थानिक नागरिक व ग्रामपंचायतीचे कर्मचारी यांनी मोठ्या शर्तीने चारा वाचवण्याचा प्रयत्न केला.

त्यावेळी परशुराम आहिरे, समाधान देवरे, राजाराम अहिरे , शांताराम अहिरे, शरद अहिरे, दयाराम अहिरे, तानाजी अहिरे , प्रकाश अहिरे, स्वप्निल अहिरे, ग्रामपंचायत मोरेनगर चे कर्मचारी नरेंद्र मोरे, प्रवीण पवार, बर्डे शिवारातील नागरिक उपस्थित होते. सटाणा अग्निशामक विभागप्रमुख संदिप पवार, कर्मचारी भूषण सोनवणे, आतिश गायकवाड राजेंद्र आहेर, आदींनी मोठी मेहनत घेतली घटनास्थळी ठेगोडा येथील तलाठी अविनाश कापडणीस यांनी भेट देऊन पंचनामा केला…


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here