आई-बापाला पैशाचा हव्यास ; पोटच्या मुलांचा केला तीन लाखांत सौदा

0
55

द पॉईंट नाऊ ब्युरो : पोटचा गोळा म्हणजे पोटची मुले ही एका आईसाठी सर्वाधिक प्रिय असतात. मग ती एक मानव जात असो किंवा मग प्राणी जात. मात्र एका आईने अन बापाने पैशांच्या हव्यासापायी पोटच्या तीन मुलांना विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

नवी मुंबई भागात नेरुळ येथील एका जोडप्याने जवळपास 3 लाख रुपयांना आपल्या पोटच्या तीन मुलांचा सौदा केला. ही बाब महिला आणि बालविकास विभागाच्या ध्यानी येताच पोलिसांद्वारे संबंधित लोकांवर कारवाई करण्यात आली आहे.

आरोपी शारदा शेख आणि आसिफली फारुख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात शारदा शेख हिला अटक करण्यात आली असून, फारुख शेख हा फरार आहे. मुले ज्यांना विकली त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांचा पोलीस शोध घेत आहेत.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here