देवळा प्रतिनिधी : मन सुन्न करणारी घटना काल देवळा तालुक्यात घडली असून संपूर्ण महाराष्ट्रात या घटनेचे पडसाद उमटले आहेत. ही सर्व घटना कशी घडली हे ‘द पॉईंट नाऊ’च्या टीमने जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता पीडित युवकाच्या भावाने संपूर्ण हकीकत सांगितली त्यात तो म्हणाला, भाऊ हा शेतात काम करत असतांना दोरी घेण्यासाठी घरी गेला तेव्हा त्याला संबंधित युवतीच्या घरच्यांनी कॉल करून भेटण्यास सांगितले, त्यांनी सर्व पूर्व नियोजन करून हे घडवून आणले असे पीडित युवकाचा भाऊ म्हणाला.
पीडित युवकाला शिवीगाळ करत मुलीच्या भावाने व बापाने लाथा बुक्क्यांनी तुडवले तसेच लोखंडी रॉड ने मारले युवक जमिनीवर कोसळल्यावर त्याला मुलीच्या बापाने पकडून ठेवले तेव्हा मुलीचे भाऊ लाथा बुक्क्यांनी मारत होते तर मुलीच्या आईने पेट्रोल ओतले व मुलीने काडी लावल्याची धक्कादायक माहिती पीडित युवकाच्या भावाने दिली आहे.
चार वर्षांपासून आमचा भाऊ त्या मुलीशी बोलला नाही…
चार वर्षांपूर्वी मुलीशी संबंध होते मात्र आई वडिलांनी विरोध केल्यानंतर संपूर्ण संबंध बंद केले, मुलीचे लग्न कुठे जमले मात्र ते नंतर मोडले ते लग्न मोडल्याच्या रागातून त्यांनी हे कृत्य केल्याचे सांगितले.
लोहोणेर ता देवळा येथे प्रेमप्रकरणावरून युवकाला बेदम मारहाण करून त्याला जिवंत जाळण्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी घडला असून, यात युवक ५५ टक्के भाजल्याची प्राथमिक माहिती देवळा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली पुढील उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते . यात जिल्हा रुग्णालयात तपासले असता हा युवक 85% भाजल्याची माहिती समोर आली आहे.
देवळा पोलिसांच्या माहितीनुसार….!
संशयित आरोपींना देवळा पोलिसांनी ताब्यात घेतले तसेच देवळा पोलिसांत या घटनेचा गुन्हा दाखल करण्यात आला. देवळा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी कि , आज शुक्रवारी( दि . ११ )रोजी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास लोहोणेर ता देवळा येथे प्रेम प्रकरणावरून गोरख काशिनाथ बच्छाव ( ३१) या युवकाला रावळगाव सेक्शन ता मालेगांव येथील मुलीच्या घरच्यांनी बेदम मारहाण करून त्याचावर पेट्रोल टाकून जाळून टाकण्याचा प्रकार घडला .
या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली . जखमी व भाजलेल्यां अवस्थेतील युवकाला पोलिसांनी देवळा ग्रामीण रुग्नालयात दाखल केले . त्याच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचार्थ त्याला जिल्हा रुग्नालयात दाखल करण्यात आले आहे . यात तो ५५ टक्के भाजल्याची माहिती येथील वैदयकिय अधीक्षक डॉ . गणेश कांबळे यांनी दिली . रावळगाव ता मालेगांव येथील एका मुलीशी लोहोनेर ता देवळा येथील युवक गोरख काशिनाथ बच्छाव (३१) याची गेल्या तीन वर्षांपूर्वी ओळख झाली असून ,त्याने या मुलीशी लग्नाची मागणी केली होती .लग्न कर अन्यथा तुझ्या घरच्यांना मारून टाकेन अशी धमकी दिली होती .
या प्रकारमुळे मुलीचे इतर ठिकाणी लग्न जमत नसल्याचा संताप मुलीच्या वडिलांना आला . या रागाच्या भरात शुक्रवारी ( ११ ) रोजी मुलीच्या वडिलांनी व इतर घरातील सदस्यांनी लोहोणेर येथे येऊन गोरख बच्छाव या तरुणाचा शोध घेऊन त्याला बेदम मारहाण करून त्याच्यावर पेट्रोल टाकून जिवंत जाळून टाकण्याचा प्रयन्त केला . यात सदर युवक ५५ टक्के भाजला असून , या प्रकाराने लोहोणेर सह संपूर्ण देवळा तालुक्यात खळबळ उडाली आहे . या प्रकरणी देवळा पोलिसांनी चौकशीकामी कल्याणी गोकुळ सोनवणे (२३), गोकुळ तोंगळ सोनवणे ( ५७) ,निर्मला गोकुळ सोनवणे (५२),हेमंत गोकुळ सोनवणे (३०),प्रसाद गोकुळ सोनवणे (१८) सर्व रा रावळगाव सेक्शन ता मालेगाव या आरोपीना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, गुन्हा दाखल करण्यात करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्ष दिलीप लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम