स्वप्निल अहिरे,
आराई प्रतिनिधी : तालुक्यातील शेमळी येथील देवरे परिवाराने आपल्या आईवरील प्रेम सदैव राहावे म्हणून आईच्या मृत्यूपश्चात रक्षाविसर्जनाच्या दिवशी घराच्या आवारात वृक्षारोपण केले. अस्थींची राख नवीन रोपांना टाकत नवा पायंडा पाडला आहे. त्यामुळे या उपक्रमाचे ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील नागरिकांनी स्वागत केले.
सटाणा तालुक्यातील नवी शेमळी या गावातील प्रगतशील शेतकरी राजेंद्र मोतिराम देवरे यांच्या मातोश्री रेशमाबाई मोतीराम देवरे यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. मंगळवार दिनांक ५ जानेवारी रोजी रक्षा विधीचा कार्यक्रम होता. अस्थिविसर्जनची अस्थीसह जमा केलेली राख नदीत न टाकून देता आपल्या घरासमोर नवीन वृक्षाची लागवड केलेल्या वृक्षांना टाकत पर्यावरण संरक्षणाचा दुहेरी संदेश यामध्यामातून दिला गेला. शेमळी येथील ग्रामस्थांनी असाच उपक्रम करण्यास सुरुवात केली आहे. अशा प्रकारचा उपक्रम प्रत्येक कुटुंबीयांनी वृक्षारोपण करत पर्यावरण पूरक उपक्रम राबवला जावा व आपल्या प्रियजनांच्या आठवणी वृक्षाच्या रूपात जिवंत ठेवाव्यात अशी इच्छा देवरे व पाटील परिवाराने व्यक्त केल्या.
आमच्या आईच्या स्मृती झाडाचे रुपात आमच्यासोबत सदैव असाव्यात म्हणून आम्ही आमच्या घरासमोर वृक्षारोपण केले आहे. या वृक्षांना अस्थींसह जमा केलेली राख टाकून त्या वृक्षांचे व्यवस्थित रित्या संगोपन करून आम्ही ते झाड बघितल्यावर आईची आठवण कायम स्मरणात राहील.
– राजेंद्र देवरे, नवी शेमळी
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम