आंतरराष्ट्रीय प्रकल्पात सहभागी झाल्याबद्दल प्रज्ञा गायकवाड यांचा गौरव

0
46

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; इको ट्रेनिंग सेंटर, स्वीडन यांनी कोरोना काळात इंडिया बांगलादेश मधील शिक्षक आणि विद्यार्थी यांचेसाठी टेली कोलॅबोरेशन प्रोजेक्ट आयोजित केला होता.

यामध्ये सहभाग घेऊन उत्तम प्रदर्शन करणाऱ्या नाशिक मधील शिक्षकांना आंतरराष्ट्रीय शिक्षक दिनी,प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.यात नाशिक जिल्ह्यातील निवडक शिक्षकांचा सहभाग होता. जिल्हा परिषद शाळा लाडची, ता.नाशिक येथील शिक्षिका प्रज्ञा एकनाथ गायकवाड या ह्या प्रोजेक्ट मध्ये सहभाग घेतल्याबद्दल गौरव करण्यात आला.

या प्रोजेक्ट मध्ये एकूण १५ चर्चासत्र होती.यात पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन द्वारे आपल्या देशातील संस्कृती दर्शविणे, गुणवत्ता पूर्ण शिक्षण,विविध विचार प्रवाह, संयुक्त राष्ट्र संघाने निर्धारित केलेल्या १७ शाश्वत ध्येयांपैकी ७ ध्येयांवर आपसात विचारांची देवाण घेवाण करण्यात आली.

या उपक्रमात झूम मिट, गूगल, यू ट्यूब, फेसबुक या समाज माध्यमांचा प्रभावी वापर करण्यात आला, प्रज्ञा गायकवाड यांच्या टीम मध्ये भारता कडून त्या आणि बांगलादेश मधील तीन शिक्षक होते.या जागतिक समस्या आणि त्यांचे शिक्षणावर होणारे परिणाम यांच्यावर देखील चर्चा करण्यात आली.

ऑनलाईन गुणगौरव समारंभ प्रसंगी इको ट्रेनिंग सेंटर चे सेक्रेटरी जनरल डॉक्टर ईजात हसन (स्वीडन)आंतरराष्ट्रीय समन्वयक डॉ एजाम सय्यद (इजिप्त) यांचे मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय समन्वयक प्रा.योगेश सोनवणे (पुणे) बांगलादेशच्या राष्ट्रीय समन्वयक आयेशा सिद्दिका यांची प्रमुख उपस्थितीत आंतरराष्ट्रीय प्रकल्पात उल्लेखनीय सहभागाबद्दल प्रज्ञा गायकवाड यांचा गौरव करण्यात आला.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here