अहमदनगरमधील रुग्णालयात अग्नितांडव

0
39

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : अहमदनगरमधील रुग्णालयात आज भीषण अग्नी लागल्याची घटना पुढे आली आहे. आज सकाळी १० वाजता आग लागल्याचे सांगितले जात आहे. जिल्हा रूग्णालयात ही आग लागली आहे. मिळालेला माहितीनुसार, या आगीत २-३ नागरिक दगावली आहेत. तर या आगीमुळे १० नागरिक जखमी असल्याची माहिती मिळत आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आयसीयू वॉर्डामध्ये ही आग लागली आहे. ज्यावेळी ही आग लागली त्यावेळी एकूण २० रुग्ण उपचार घेत होते. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी तात्काळ अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले. तातडीने अधिकाऱ्यांनी त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात केली.

दरम्यान आग भीषण असून २ ते ३ नागरिक दगावल्याची माहिती मिळत आहे. शिवाय मृतांचा आकडा वाढण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. ऐन दिवाळीच्या दिवसांमध्ये अश्या घटना घडणे दुर्दैवी आहे. याकडे प्रशासन देखील लक्ष देत आहे.

मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे
अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयाला लागलेल्या आगीतील मृतांची संख्या १० वर पोहोचल्याची माहिती आहे. रुग्णालयातील या आगीत अनेक जण भाजले आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. आयसीयूमध्ये ही आग लागल्यानंतर तातडीने अग्निशमन विभागाला माहिती देण्यात आली. हॉस्पिटलच्या तळमजल्यावर आग लागली आहे.

२० जखमींना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले
जिल्हा रुग्णालयाला लागलेल्या आगीमुळे २० जणांना जवळच्या अन्य रुग्णालयात हलवण्यात आले आहे.  आतापर्यंत मिळालेल्या अपडेटनुसार १३ – १४ जण जखमी झाले आहेत.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here