द पॉंईंट नाऊ प्रतिनिधी : अहमदनगर शहरात कोरोना रुग्णांचे प्रमाण वेगात घटत आहे. अहमदनगर जिल्हा रुग्णालयात नवीन तयार केलेल्या कोविड विभागातील अतिदक्षता विभागात १७ कोविड रुग्ण उपचार घेत होते. त्यातील ११ जणांचा आज मृत्यू झाला. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. काल ( शनिवारी ) केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार, राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील, आरोग्य मंत्री राजेश टोपे, पालकमंत्री हसन मुश्रीफ, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, नगरविकास राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे आदींसह खासदार व आमदारांनी घटनास्थळाला भेट दिली.
या प्रसंगी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी राज्य सरकारच्या वतीने मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर केली. तसेच या घटनेची विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नियुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. महापालिकेच्या अग्निशमन विभागाला फायर फायटर ऑडिट संदर्भातील चौकशीचेही आदेश देण्यात आले आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. भारती पवार म्हणाल्या, ही दुर्दैवी घटना आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सकांकडून शॉकसर्केटमुळे ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात आले आहे. यात ११ रुग्णांचा मृत्यू झाला. उर्वरित सहा रुग्णांची आम्ही भेट घेतली. त्यांची प्रकृती स्थिर आहे. चौकशी कमिटी नेमण्याचे आदेश दिले आहेत. चौकशीनंतर दोषींवर कारवाई होईल. राज्याकडून पाच तर केंद्राने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाकडून २ लाखांची मदत जाहीर केली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम