मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराची पोलखोलसाठी भारतीय जनता पार्टीकडून पोलखोल अभियान सुरु केले आहे. मात्र, त्याआधीच भारतीय जनता पक्षाला नुकसान करणारी घटना समोर आली आहे. पोलखोल अभियानातील भाजपाचा रथाचे नुकसान झाले आहे. हे पाहता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
महापालिकेतील भ्रष्टाचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी भाजपने पोलखोल यात्रा सुरु केली आहे. या आधीच या यात्रेत मुंबईतील कांदिवली येथे पोलखोल स्टेजची आणि साहित्याची तोडफोड करण्यात आली आहे. चेंबूर आणि कांदिवली येथील पोलखोल रथाची आणि साहित्याची तोडफोड करण्यात आली आहे. पोलखोल यात्रेच्या रथावर अज्ञातांकडून दगडफेक केली आहे. दगड मारून या रथाच्या काचा फोडण्यात आल्या.
फडणवीसांचे खुलेआम आव्हान, कितीही त्यांनी तोडफोड केली तरी आम्ही पोलखोल करणारच. आम्हला कल्पना होती की, रथाची किंवा आमच्या साहित्याची तोडफोड केली जाणार आहे. तरीही आम्ही आमचे काम पुढे चालू ठेवणार असे ते म्हणाले आहेत. तसेच भाजपा नेते प्रवीण दरेकर आणि इतर कार्यकर्त्यांकडून मुंबईतील कांदिवलीमध्ये आंदोलन करण्यात आले आहे. हल्ला करण्याचे कारण म्हणजे भ्रष्टाचार उघडकीस आल्याने लोकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्या अस्वस्थतेमुळेच अशा प्रकारचा हल्ला होतोय.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम