तुषार रौदळ
सटाणा प्रतिनिधी : बागलाण तालुक्यातील सारदे गावा शेजारील रस्त्यावर अवैधरित्या गोवंशाची वाहतूक करणाऱ्या पिकअप वाहनाला सतर्क नागरिकांच्या मदतीने जायखेडा पोलीसांनी शुक्रवार(दि.१०)रोजी ताब्यात घेतले आहे. या भागातील आठवड्याभरात अवैध गोवंशाची वाहतूकीची दुसरी घटना घडली आहे.
या भागात अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांच्या पशुधनावर रात्रीतुन डल्ला मारत अवैध गोवंश वाहतूक होत होती. या गोवंश जातीच्या जनावरांना वाहनात निर्दयपणे कोंबुन बिनबोभाट अवैध वाहतुक चालू असल्याची माहिती काटवन, मोसम, करंजाडी या भागातील नागरिकांना मिळाली होती. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी गोवंश वाहतुकीला आळा बसावा यासाठी आता ते जागृक झाले आहेत.
मागच्या आठवड्यातच गोवंश वाहतुक करणारा पिक अप तरुणांच्या मदतीने जायखेडा पोलिसांनी अंबासण फाट्यावरून ताब्यात घेतले होते. आठवडा उलटत नाही तोच आता पुन्हा सारदे(बागलाण)गावा शेजारी अंबासणहुन सारदे गावाकडे रात्री साडेनऊच्या सुमारास गोवंश निर्दयपणे वाहनात कोंबुन अवैध वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती जायखेडा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक तुषार भदाणे, पंकज गुंजाळ, उमेश भदाणे यांना मिळाली होती. साह्य्यक पोलीस निरीक्षक श्री कृष्ण पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील सतर्क नागरीकांच्या मदतीने सापळा रचून भरधाव वेगाने जाणारेपिट अप वाहन क्रमांक( एम.एच १८,एम९०५५) ताब्यात घेतले आहे. या वाहनातील दोन गायी व नऊ गोर्हे ताब्यात घेतले असून, त्यांची पशुवैद्यकीय दवाखान्यात तपासणी करण्यात येऊन मालेगाव येथील गोशाळेत रवानगी करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम कायद्यानुसार वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम