अवघ्या 15 दिवसात मातृत्व हरपलेल्या भावंडांना ‘शिवनिश्चल’ संस्थेचा आधार

0
15

देवळा प्रतिनिधी : तालुक्यातील वार्शी येथील आदिवासी कुटुंबातील एका चिमुरड्याच्या जन्मानंतर आईच्या मृत्यूने कुटुंब उघड्यावर पडल्याचे समजताच या कुटुंबाला मदतीचा ओघ सुरू झाला असून ,आई नसणाऱ्या अनाथ व निराधार मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी येथील शिवनिश्चल संस्थेने घेत आर्थिक मदत देऊन मुलांच्या शिक्षणाची व मुलीच्या लग्नापर्यंतची जबाबदारी घेतली आहे.

वार्शी ता देवळा येथील अनाथ मुलांच्या कुटुंबातील सदस्यांना आर्थिक मदत करतांना शिवनिश्चलचे प्रा येशवन्त गोसावी समवेत प्रा डी के आहेर माजी सरपंच बळीराम पवार आदी छाया सोमनाथ जगताप

याबाबत अधिक माहिती अशी की ,वार्शी ता देवळा येथील मातृछत्र हरपलेल्या शेतमजूर कुटुंबातील अनाथ मुलांच्या पाठीशी ‘शिवनिश्चल’ ठामपणे उभे राहील असे आश्वासन अध्यक्ष यशवंत गोसावी यांनी दिले आहे. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रा. यशवंत गोसावी, प्रा. डी. के. आहेर, प्रहारचे कृष्णा जाधव, पत्रकार अंकुश सोनवणे, माजी सरपंच भाऊसाहेब माळी, बळीराम वाघ उपस्थित होते.

हीच आपली दिवाळी आणि हीच आपली होळी असे म्हणत गोसावी यांनी हे कार्य अजून जोमाने करायचे असून समाजातील दानशुराणी एकत्र येत अशाप्रकारे समाज परिवर्तन घडवावे असे आवाहन यावेळी केले.
प्रा. गोसावी म्हणाले कि, शिवनिश्चल सेवाभावी संस्थेच्या वतीने २०१५ सालापासून मदतनिधी उपक्रम तसेच अनाथांना आधार देण्याचे काम सुरू आहे. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांसह अनाथ व निराधार मुलांना मदत दिली जाते. तसेच अन्य काही कारणांनी अनाथ झालेल्या चिमुरड्यांची जबाबदारी शिवनिश्चल ट्रस्ट घेत असते.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here