द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : अवकाळी पावसाने पहिलेच शेतकऱ्यांना तोट्यात पडले असून आता अजून पावसाची शक्यता महाराष्ट्रमध्ये वर्तवण्यात आली आहे.
पूर्व-मध्य अरबी समुद्र ते महाराष्ट्र किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. यामुळे राज्यात ढगाळ वातावरण आणि विविध भागांत पाऊस पडत आहे. सोमवारी मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यात काही भागांत विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विदर्भातील चंद्रपूर शहरात देखील पावसाचे काही थेंब पडल्याचे समजले आहे. या अवकाळी पावसाने शेतातील पिकांवर अळी पडण्याची शक्यता आहे. यामुळे पीक खराब होतील.
राज्यात रविवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणात काही ठिकाणी मुसळधार पाऊस, तर मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला. सर्वाधिक किमान तापमान १७.९ अंश सेल्सिअस महाबळेश्वर येथे नोंदले गेले, तर उच्चांकी तापमानाची नोंद ३५.४ अंश सेल्सिअस सांताक्रूझ येथे झाली. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ३० अंशांच्या खालीच आहे, तर कोकण आणि विदर्भात कमाल तापमान अधिक असल्याचे दिसून आले.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच उत्तर कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. विदर्भ, मराठवाडा, कोकण येथे टप्याटप्याने पावसाचा प्रभाव पडेल. येत्या दोन दिवसांमध्ये मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर कोकणामध्ये त्याचा सगळ्यात जास्त प्रभाव असेल असे सांगण्यात येत आहे. रायगड, ठाणे, पालघर आणि मुंबईत याचा प्रभाव असेल असे हवामान खात्याने वर्तविले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम