अवकाळीने बागलाण मध्ये कांदा – द्राक्ष पिकांवर रोगराईची भीती

0
22

तुषार रौदळ
सटाणा प्रतिनिधी : राज्यभरात सुरू असलेल्या अवकाळी पावसाने सर्वांची झोप उडवली आहे. नाशिकच्या बागलाण तालुक्यात शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे.

अचानकपणे बदललेल्या वातावरणाने शेतकरी पूर्णतः हवालदिल झाले आहेत. पावसाचा कोणत्याही प्रकारचा अंदाज नसल्याने इथल्या शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने उन्हाळी कांद्याची रोपे खराब होण्याची भीती बागलाण मधील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

द्राक्ष बागांना देखील अवकाळी पावसाचा मोठा फटका बसण्याची भीती आहे. ज्या द्राक्ष बागा काढणीला आल्या होत्या, अशांना या बदललेल्या वातावरणाचा मोठा फटका बसू शकतो. बदलत्या वातावरणामुळे द्राक्षांवर परिणाम होऊन, तो माल शेतकऱ्यांना कवडीमोल भावात विकावा लागण्याची भीती आहे.

बागलाण तालुक्यात आत्ता पर्यंत या वातावरणाने मोठे नुकसान केले आहे. या वातावरणामुळे मेंढपाळांच्या पशुधनाला जबर फटका बसला आहे. तालुक्यात आत्ता पर्यंत बदललेल्या वातावरणामुळे 300 हुन अधिक मेंढ्या मृत पावल्या आहेत. याबाबत प्राथमिक माहिती महसूल विभागाने दिली आहे. मृत्यू पावलेल्या पशुधनाचे पंचनामे करण्यात येणार आहेत. तर त्यासोबतच नुकसानग्रस्त शेतपिकांचे देखील पंचनामे केले जाणार आहेत.

शेतकरी वर्गाने कांद्याची बियाणे उशिरा पावसाळा असल्याने, उशिराने टाकली होती. येत्या 20 – 22 दिवसांत ही रोपे लागवडीसाठी आली असतांनाच, बेमोसमी पावसाने मोठा दगा दिला. बदललेले वातावरण, पाऊस अशा कारणाने रोपांना बुरशीजन्य रोगांचा देखील सामना करावा लागणार आहे.

बागलाण मधील शेतकरी वर्गाला मागील तीन चार वर्षांपासून द्राक्ष बागांना पाऊस, गारपीट याने मोठा फटका बसला आहे. परंतु, या संकटातून देखील सावरत शेतकरी वर्गाने नव्याने प्रारंभ केला. मात्र आता पुन्हा या बदलत्या वातावरणाने शेतकऱ्यांसमोर चिंतेचे ढग दाटले आहेत.

शेतकरी मोठं कष्ट करून, कर्ज काढून महागात महाग औषध फवारणी करुन शेतात पीक पिकवतो. मात्र आता या बदलत्या वातावरणाने शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं केलं आहे.

ही बातमी वाचलीत का?

वडापाव (Vadapav) हा सामान्य नागरिकांचा (Common Man) अतिशय जिव्हाळ्याचा आहे. आता याच वडापाव (Vadapav) मध्ये नाव कमावलेल्या छोटू (Chhotu)या फ्रांचायजीवर
(Franchise) कारवाई करण्यात आली आहे.

नाशिकच्या (Nashik) उत्तम नगर (Uttam Nagar) येथील छोटू (Chhotu) वडापावच्या फ्रांचायजीवर कारवाई करण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाने ही कारवाई केली.

वडापाव हा चाकरमान्यांसाठी अतिशय आवडता आणि तात्काळ पोटाला दिलासा देणारा पदार्थ आहे. मात्र याच वडापावच्या बळावर आपले नाव कमावणाऱ्या छोटू या फ्रांचायजीने आपल्या ग्राहकांना मोठाच धक्का दिला आहे.

अधिक माहितीसाठी पुढील लिंक वर क्लिक करा.

‘छोटू’ वडापाव खाताय, तर सावध व्हा!


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here