द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; दिल्ली येथे पोलीस कर्तव्यात आपली सेवा बजावत असलेली साबिया सैफी एकटी असल्याचा फायदा घेऊन चार नराधमांनी बलात्कार केला व तिला जंगलात फेकून दिले, माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली असून या नराधमांना कठोर शिक्षा करावी याचे निवेदन नाशिक जिल्हा उत्कर्ष समितीने देवळा येथे तहसीलला निवेदन दिले आहे.
तसेच 31 ऑगस्टला चंदीगड ला जाणारी अल्पवयीन मुलीवर देखील मदतीच्या बहाण्याने अत्याचार केलेत, अशा सर्व गुन्हेगारांना कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी समितीने केले आहे.
यावेळी तनवर अशरीफ मणियार, अक्रम तांबोळी , शाकिर सैयद, शाबीर तांबोळी, नईम पठाण, पटेश शिवदे, ननिज तांबोळी, मुजाहिद्द शेख, नाशिर शेख, वसीम शेख, सागर लाडे आदी उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम