द पॉईंट नाऊ ब्युरो : अल्पवयीन पत्नीशी शारीरिक संबंध ठेवल्यामुळे एकाला 10 वर्षांची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. मुंबई येथील पॉक्सो न्यायालयाने हा निर्णय सुनावला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, एकाने 14 वर्षीय मुलीला आझमगढ येथे पळवून नेत तिच्याशी लग्न केले. लग्न केले त्यावेळी मुलीचे वय हे 14 वर्ष होते. या व्यक्तीने मुलीशी ठेवलेल्या शारीरिक संबंधांना न्यायालयाने बलात्कार गणत 10 वर्षांची शिक्षा सुनावली. या व्यक्तीचे वय 32 वर्ष आहे.
दरम्यान, या दोघांचेही एकमेकांशी प्रेमसंबंध होते. असा युक्तिवाद संबंधित व्यक्तिद्वारे करण्यात आला होता. मात्र न्यायालयाने त्यास शिक्षा ठोठावत कोठडीत रवानगी केली आहे.
देशात मुलींच्या लग्नाचे वय हे 18 वर्षांच्या वर ठरवण्यात आले आहे. मात्र या मुलीचे वय लग्नाच्या वेळी 14 वर्ष असल्याने, तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्या कारणाने न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम