अर्धनग्न आंदोलन प्रहारचे ; वाभाडे प्रशासनाचे

0
201

देवळा प्रतिनिधी : उमराने कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून कांदे खरेदी केला . मात्र शेतकऱ्यांना त्याचा मोबदला दिला नाही. वेळोवेळी शेतकऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली, राजकीय नेत्यांच्या वरदहस्त असल्याने व्यापाऱ्यांचे फावले आहे. देवळा तालुका प्रहारचे अध्यक्ष संजय दहिवडकर यांनी कृष्णा जाधव यांच्या उपस्थितीत अर्धनग्न आंदोलन करून प्रशासनाचे लक्तरे वेशीवर टांगले आहेत.

उमराने बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी केला, त्यावेळी नोटबंदीच्या कारणाने त्यांनी रोकड ऐवजी धनादेश दिला मात्र तो वठला नाही. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. अजूनही व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. बाजारसमितीत वेळोवेळी पाठपुरावा करून देखील शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार व्यापारी व प्रशासनाकडून झाला. या शेतकऱ्यांच्या असंतोषाला वाचा फोडण्यासाठी प्रहारचे संजय दहिवडकर यांनी देवळा येथील जुन्या तहसील कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन केले . यामुळे जिल्ह्याभरात हा चर्चेचा विषय ठरल्याने प्रशासनाच्या हलगर्जीपणाचे वाभाडे निघालेत.

व्यापाऱ्यांच्या मालमत्तेचा लिलाव होणार

प्रहार जनशक्तीच्या आंदोलनाने प्रशासन झोपेतून जागे झाले. ज्या व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली त्यांच्या मालमत्तेचा लिलाव होणार असल्याने ,शेतकऱ्यांनी प्रहारचे आभार मानले आहेत. ही मालमत्ता विकून शेतकऱ्यांना दिलासा मिळेल , शेतकऱ्यांचे पैसे देण्यात येतील. अशी माहिती प्रशासनाने दिली.

या आंदोलनाला शिवसंग्राम संघटनेचे प्रदेश अध्यक्ष उदयकुमार आहेर, राष्ट्रवादीचे सुनील आहेर, जितेंद्र आहेर, दीपक जाधव, आनंदा देवरे , राजेंद्र शिरसाठ यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी पाठिंबा दर्शवला.

प्रहार संघटना देवळा तालुक्यात अन्याय विरोधात पुढे येतेय….

प्रहार संघटनेने आजपर्यंत अनेक विषयांना हात घातला असून, देवळा तालुक्यातील नागरिकांना संजय दहिवडकर, कृष्णा जाधव या प्रहारच्या शिलेदारांकडून अन्यायाला वाचा फोडण्याचे काम होत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे.W


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here