अमोल कोल्हे यांच्या ‘नथुराम गोडसे’ भूमिकेवरून वादंग

0
52

द पॉईंट नाऊ ब्युरो : अभिनेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांना त्यांचा आगामी चित्रपट ‘व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटातील नथुराम गोडसेंच्या भूमिकेवरून सध्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

अमोल कोल्हे त्यांच्या आगामी चित्रपटात ते नथुराम गोडसे यांची भूमिका साकारत आहेत. यावरून काँग्रेस नेते नाना पटोले यांनी कोल्हे यांचा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशारा दिला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अमोल कोल्हे यांची पाठराखण केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच अमोल कोल्हे यांच्या मुद्द्यावरून दोन गट पडले आहेत. आणि आता या वादात अभिनेते नाना पाटेकर यांनी उडी घेतली आहे. मी स्वतः ‘द लास्ट माउंटबॅटन’ या चित्रपटात नथुराम गोडसे यांची भूमिका केली आहे. कोणाच्या भूमिका करण्याने तो त्या विचारांचे समर्थन करतो असे नाही. कोणी कोणती भूमिका करावी हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. असे नाना पाटेकर यांनी म्हटले आहे.

आता या वादाने अमोल कोल्हे यांचा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच ग्रहण लागल्याने, तो प्रदर्शित होणार का? यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here