सोमनाथ जगताप
देवळा प्रतिनिधी : बागलाण तालुक्यातील दहिंदुले येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेच्या क्रीडाशिक्षिका कु.अमृता वसंत बोरसे यांना यंदाचा राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर झाला आहे.
नाशिक येथील क्रीडा संस्कृती फाउंडेशनतर्फे दिला जाणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2020-21 साठी कु अमृता बोरसे यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून दरवर्षी क्रीडा संस्कृती फाउंडेशन तर्फे हा पुरस्कार देण्यात येतो.
अमृता बोरसे यांच्या क्रीडा क्षेत्रातील योगदानची दखल घेत निवड करण्यात आली आहे. अशी माहिती संस्थेचे सरचिटणीस उदय खरे यांनी दिली. २९ ऑगस्ट रोजी नाशिक येथे मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या निवडीबद्दल कु. बोरसे यांचे सर्व स्तरातील नागरिकांनी अभिनंदन केले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम