द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पत्नी अमृता फडणवीस यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यावर ट्विटरच्या माध्यमातून टीकास्त्र सोडले आहे. बिगड़े नवाब ने- प्रेस कॉन्फ़्रेन्स पर प्रेस कॉन्फ़्रेन्स, प्रेस कॉन्फ़्रेन्स पर प्रेस कॉन्फ़्रेन्स, प्रेस कॉन्फ़्रेन्स पर प्रेस कॉन्फ़्रेन्स बुलाई, लेकिन हर बार झूठ और मक्कारी की ही बाते हमे सुनाई, लक्ष्य इनका एक ही है, मेरे भाई बचाना है इन्हें अपना जमाई और काली कमाई! अशा शब्दात नवाब मलिकांवर टिका केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचे आरोप केले. अंडरवर्ल्ड माफियांकडून त्यांनी २०-२५ वर्षांपुर्वी कवडीमोल भावात जमीन विकत घेतल्याचा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला. त्यानंतर नवाब मलिकांनी पुन्हा पत्रकार परिषद घेत फडणवीसांनी केलेले सर्व आरोप फेटाळले आणि त्या जमीनीशी संबंधित सर्व व्यवहार कायदेशीरित्या झाले असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पत्रकार परिषदेत नबाव मलिकांनी फडणवीसांचे फटाके भिजले आणि फुसके निघाले, अशी खोचक टिकाही केली. यावर उत्तर म्हणून अमृता फडणवीस यांनी नवाब यांच्यावर ट्विटरवरून आता टीका केली आहे.
आपल्या जावयाचा काळा पैसा आणि आपले वाईट काम लपवण्यासाठी नवाब मलिक हे सगळं खोटं बोलत आहे अश्या स्पष्ट शब्दांमध्ये अमृता फडवणीस यांनी नवाब मलिक यांना सुनावले. हे प्रकरण नको त्या मार्गाने जात असल्याने अमृता फडणवीसांनी यात भाग घेतला आणि आपली प्रतिक्रिया नोंदविली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम