देवळा प्रतिनिधी : येथील रघुनाथ हरी अमृतकार पतसंस्थेस ३१ मार्च २०२२ अखेर सर्व प्रकारच्या तरतुदी वजा जाता ३५ लाख २१ हजार रुपयांचा निव्वळ नफा झाल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री भारत कोठावदे यांनी दिली .
संस्थेकडे दि ३१मार्च अखेर १३ कोटी ६७ लाखाच्या ठेवी जमा असून १० कोटी ३८ लाखाचे कर्ज वाटप केलेले आहे . संस्थेचे वसूल भागभांडवल १ कोटी ३५ लाखाचे असून विविध प्रकारचा निधी ३ काेटी ६३ लाखाचा जमा झालेला आहे .संस्थेने विविध वित्तीय संस्थांमध्ये ८ कोटी २७ लाखाची सुरक्षित गुंतवणूक केलेली आहे .संस्थेचे खेळते भाग भांडवल १९ कोटी ५६ लाखाचे असून सीडी रेशो चे प्रमाण ६२.४६ टक्के आहे .१०७७ सभासद संख्या असलेल्या पतसंस्थेचे थकबाकीचे प्रमाण ८ टक्के तर नेट एनपीए ० टक्के आहे. संस्थेस स्थापनेपासूनच ऑडिट वर्ग अ स्टार व अ प्राप्त झालेला आहे .
संस्थेने नुकताच १९ वर्षांच्या कार्यकाळाचा टप्पा पूर्ण केला आहे संस्थेची लोहणेर येथे शाखा असून लॉकर्स व सोने तारण कर्जाच्या माध्यमातून शाखेने मोठी आर्थिक प्रगती साधली आहे . संस्थेने आर्थिक प्रगतीबरोबरच सामाजिक कार्यातही मोठे योगदान नोंदवलेले आहे .
संस्थेच्या प्रगतीत श्री खरे साहेब (उपनिबंधक सहकारी संस्था नाशिक) श्री सुजय पोटे साहेब (सहाय्यक निबंधक सहकारी संस्था देवळा )संचालक मंडळ , कर्मचारीवृंद ”अल्पबचत प्रतिनिधी ,यांचा मोलाचा वाटा आहे . याप्रसंगी संस्थेचे चेअरमन श्री भूषण कोठावदे व्हाइस चेअरमन श्री राजेंद्र अहिरराव कार्यकारी संचालक श्री मनोज कापसे संजय अहिरराव रोहन वडनेरे राजेश शिरोडे राजेंद्र मुसळे सुधाकर सोनवणे संजय अहिरराव कांतिलाल देशमुख सौ ज्योती सोनकुळे सौ मनीषा वाघ व्यवस्थापक दावल आहेर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम