अमृतकार पतसंस्थेने ठेवीदारांचा विश्वास संपादन केला – केदा आहेर

0
31

देवळा प्रतिनिधी : अमृतकार पतसंस्थेने ठेवीदारांचा विश्वास संपादन केला असून, विस्तारित शाखेच्या माध्यमातून सभासदांना आर्थिक व्यवहारासाठी सुविधा उपल्बध करून देत अल्पावधीत संस्थेने सहकार क्षेत्रात दमदार कामगिरी केल्याने मनस्वी आनंद झाला आहे .

संस्थेच्या हितासाठी आपण नेहिमीच संचालक मंडळाच्या पाठीशी असल्याचे सूतोवाच जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष केदा आहेर यांनी आज येथे केले . देवळा येथील रघुनाथ हरी अमृतकार पतसंस्थेच्या वतीने सर्व सभासदांना भेट वस्तू वाटप व बक्षीस ठेव योजनेचा सोडत समारंभ ( २५) रोजी केदा आहेर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला . यावेळी ते बोलत होते .

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून किशोर सूर्यवंशी पतसंस्थचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद ( दादा ) पाटील ,माजी सभापती बापु देवरे , लोहोनेरचे ग्रामपंचायत सदस्य निंबा धामणे, उमराणा बाजार समितीचे सभापती प्रशांत देवरे , देमकोचे कार्यकारी संचालक डॉ प्रशांत निकम ,संचालक राजेंद्र सूर्यवंशी ,नगरसेवक जितेंद्र आहेर आदी उपस्थित होते . संस्थेच्या वतीने नुकत्याच झालेल्या देवळा नगरपंचायतिच्या नवनिर्वाचित सर्व नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला . नवनिर्वाचित नगरसेविका भाग्यश्री पवार , जितेंद्र आहेर ,संतोष शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले . संस्थापक भारत कोठावदे यांनी प्रास्ताविक केले . कार्यक्रमास चेअरमन भूषण कोठावदे, व्हा चेअरमन राजेंद्र अहिरराव, कार्यकारी संचालक नमनोहर कापसे, संजय अहिरराव , राजेंद्र शिरोडे ,कांतीलाल देशमुख ,राहोन वडनेरे ,दामोधर मुसळे ,ज्योती सोनकुळे ,मनीषा वाघ आदींसह सभासद ,ठेवीदार उपस्थित होते . सूत्रसंचलन प्रा . गोरख निकम यांनी केले तर आभार व्यवस्थापक दावल आहेर यांनी मानले . कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले .कोरोनाचे सर्व नियम पाळून कार्यक्रम घेण्यात आला .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here