अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस इडीच्या रडारवर

0
30

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) आता चांगलीच अडचणीत आली आहे. तब्बल दोनशे कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणातील आरोपीसोबत ती चुंबन घेत असलेली सेल्फी समोर आल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे हा आरोपी जामिनावर बाहेर आला होता, त्यावेळची ही सेल्फी आहे. मागील काही दिवसांपासून या आरोपीमुळेच जॅकलिन सक्त वसुली संचालनालयाच्या (ED) रडारवर आहे.

सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrasekhar) असे या आरोपीचे नाव आहे. तब्बल दोनशे कोटींच्या खंडणी प्रकरणातील तो मुख्य सूत्रधार आहे. त्याचा आणि अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून जॅकलिन आणि सुकेशचे प्रेमसंबंध होते का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. हा फोटो या वर्षी एप्रिल-जून महिन्यातील आहे. त्यावेळी सुकेश हा जामिनावर बाहेर होता. सुकेश हा जॅकलिनला चेन्नईमध्ये चार वेळा भेटला होता. या भेटींसाठी त्याने प्रायव्हेट जेटचीही व्यवस्था केली होती, असे समजते.

व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये सुकेश चंद्रशेखर हा मिरर सेल्फी घेताना दिसत आहे. तो जॅकलिनच्या गालावर चुंबन घेताना दिसत आहे. त्यावेळी त्याच्या हातात असलेला आयफोन १२ प्रो हा फोन आहे. याच फोनद्वारे सुकेश चंद्रशेखरने इस्रायली सिमकार्ड वापरून खंडणी मागितली होती. सुकेश तुरुंगात असतानाही तोच मोबाईल वापरत होता. कर चुकवेगिरी प्रकरणात गेल्या महिन्यात ईडीकडून जॅकलिनची तब्बल सात तास चौकशी झाली होती.

गेल्या महिन्यात, सुमारे सात तास जॅकलिनची अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) कॉनमन सुकेश चंद्रशेखर आणि त्याची पत्नी, अभिनेत्री लीना मारिया पॉल यांच्या 200 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात चौकशी केली होती. जॅकलिनच्या प्रवक्त्याने अधिकृत विधान जारी केले होते की, “जॅकलीन फर्नांडिसला ईडीकडून साक्षीदार म्हणून साक्ष देण्यासाठी बोलावण्यात आले आहे. तिने तिचे जबाब नोंदवले आहेत आणि भविष्यात ती एजन्सीला पूर्णपणे सहकार्य करेल. तपास.”

जॅकलिन फर्नांडिस या प्रकरणात सक्त वसुली संचालनालयासमोर (ईडी) 20 ऑक्टोबरला हजर झाली होती. ईडीच्या पथकाकडून तिची चौकशी करण्यात आली होती. या प्रकरणात सुकेश चंद्रशेखर मुख्य आरोपी आहे. सलग चार वेळा चौकशीला हजर होणे टाळल्यानंतर अखेर ईडीच्या दिल्ली कार्यालयात जॅकलीन हजर झाली होते. कर चुकवेगिरी प्रतिबंधक कायद्यातंर्गत जॅकलिनचा जबाब त्यावेळी नोंदवण्यात आल्याचे आला होता. जॅकलिनचे आर्थिक व्यवहार आणि सुकेश चंद्रशेखरसोबत तिची ओळख यामुळे ती ईडीच्या रडारवर आहे. सुकेश चंद्रशेखरचा जॅकलिनचा काही आर्थिक व्यवहार झाला होता का? या अंगाने ईडी तपास करत असल्याचे सूत्रांनी सांगितले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here