अभिनयातील ‘देव’ अखेर विजला! जेष्ठ अभिनेते रमेश देव यांचे 93 व्या वर्षी निधन…

0
35

मराठी चित्रपत्रसृष्टीतील राजबिंडा अभिनेता म्हणून ओळखले जाणारे रमेश देव यांचं आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. नुकतच काही वेळापूर्वी माध्यमाद्वारे याचे वृत्त समोर आले आहे. त्यांचा मुलगा अजिंक्य देव यांनी माध्यमांशी संपर्क साधला त्यावेळेस बोलताना त्यांनी रमेश देव यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

नुकतच हल्ली तीन दिवसांपूर्वी 30 जानेवारी ला अभिनेते रमेश देव त्यांचा 93 वा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी चाहत्यांनीही त्यांच्या दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. मात्र अचानक असं घडल्यामुळे सिनेसृष्टीला झटका मिळाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते अशा बातम्या सुरू असतात. अखेर वयाच्या आज 93 व्या वर्ष त्यांनी शेवटचा श्वास घेतला. आज हृदयविकाराच्या झटक्याने मराठी सिनेसृष्टीतील जेष्ठ अभिनेते रमेश देव यांची प्राणज्योत मालवली.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here