अफगाणमध्ये तालिबानचा ‘शरिया कायदा’ नागरिकांची झोप उडवणार

0
42

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : संपूर्ण जगभरात सर्वात प्रबळ ही लोकशाही आहे. जवळ जवळ सगळ्याच देशांत लोकशाही पद्धतीने कार्यभार चालतो. मात्र अफगाणिस्तान मध्ये या लोकशाहीला आता काही स्थान उरलेले नाही.

अफगाणिस्तान मध्ये सध्या तालिबान ने सत्ता काबीज केली आहे. ज्यामुळे संपूर्ण अफगाणिस्तान मध्ये लोकांची जिवाच्या आकांताने धावपळ चालू आहे. आणि आता तालिबान ने अफगाणिस्तान मध्ये लोकशाहीला कोणतेही स्थान राहणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. अफगाणिस्तान मध्ये यापुढे केवळ शरिया कायदा लागू असेल, असे तालिबान द्वारे स्पष्ट करण्यात आले आहे. तालिबानचा नेता वहिदुल्ला हाश्मीने अफगाणिस्तान मध्ये लोकशाहीला स्थान राहणार नसून, शरिया कायदा लागू केला जाईल असे स्पष्ट केले आहे.

हिबतुल्लाह अखुंदजादा या तालिबानच्या सर्वोच्च नेत्याच्या हातात आता अफगाणिस्तानची सत्ता असणार आहे.

शरिया कायदा हा सर्वात कठोर असा कायदा आहे. ज्यात कठोरात कठोर शिक्षा केल्या जातात. चोरी, धर्माला अनुसरून न वागणे, अमली पदार्थांचे सेवन अशा गुन्ह्यांसाठी शरिया कायद्यामध्ये भयावह शिक्षा आहेत. ज्यात अवयव छाटने, चाबकाचे फटके देणे, जाहीर मृत्युदंड, दगडाने ठेचून मारणे अशा भयावह आणि कठोर शिक्षा आहेत.

तालिबान याच शरिया कायद्याचा मोठा पुरस्कर्ता आहे. तालिबानने सदैव शरिया कायद्याला पाठिंबा दिला आहे. आणि आता अफगाणिस्तान मध्ये तालिबानची सत्ता आल्यानंतर तिथे शरिया कायदा लागू केला जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

शरिया कायद्यामध्ये आधी खूप कठोर शिक्षा होत्या. मात्र कालांतराने त्यात काहीशी सौम्यता आली. तरी आजही भरपूर प्रमाणात कट्टरतावादी मुस्लिम लोक जुन्याच शरिया कायद्यानुसार अंमल करायच्या समर्थनार्थ आहेत.

कसे राहायचे, कसे वागायचे, प्रार्थना कशी करायची, उपवास कसा करायचा, दान कसे आणि केव्हा करायचे असे अनेक नियम शरिया कायद्यामध्ये आहेत.
महिलांनी बुरखा घालूनच बाहेर पडणे, बाहेर पडताना कोणालातरी सोबत घेऊन बाहेर पडणे, सार्वजनिक ठिकाणी महिलांचा आवाज येता कामा नये , महिलांनी फोटो न काढणे, फोटो सार्वजनिक ठिकाणी प्रदर्शित न करणे असे अनेक कठोर नियम महिलांना शरिया कायद्यात घालून देण्यात आलेत.

अशा या शरिया कायद्यामुळे अफगाणिस्तान मधील लोकांना आता धास्तीतच जगावे लागणार आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here