आज रविवार होता. त्यात सुट्टीचा दिवस, म्हणजे मस्त आराम करायचा ठरवलं. पण मध्येच आवाज आला. मिनू लवकर उठ मला आज बाहेर जायचं आहे. जरा सामान खरेदी करायचं आहे.
बाबांना आणि दादूला स्वयंपाक करून दे आणि घरातलं थोडं काम कर जरा हे ऐकून मिनूला राग आला रोजच आहे..तेच काम एक दिवससुद्धा झोपू देत नाही. मला या विचाराने ती चिडली. तिच्या मनात विचार आला खरंच बाई होणं किती अवघड असतं? तिला कोणत्याचं गोष्टीपासून सुटका नसते का बरं असं? ती खूप विचार करू लागली. तितक्यात तिला आवाज आला. मिनू कुठे आहेस तू ? आज आपण बाहेर जाऊया का थोडं हे ऐकून तिला समजले हा आवाज आपल्या मैत्रिणीचा ( मुक्ता )चा आहे.
ती म्हणली नको आज मला खूप काम आहे.आई पण घरी नाही आहे. ती पुढचं बोलणार तर लगेच मुक्ता म्हणली चलो आज कुछ अलग करते है यावर ती बरं ठीक आहे. म्हणून पटपट कसं तरी काम आवरते तिला मुक्ता थोडी मदत करते.आणि बाबा ना सांगते जेवण करून घ्या. दादू ला पण सांगा इतकं बोलून मुक्ता आणि मिनू पटापट आवरून निघतात. पण मिनूला माहित नव्हतं. मुक्ता ही कुठे घेऊन चालली? पण जिकडे पण जाईल तिकडे चांगल असेल. इतका विश्वास तिला होता यावर मुक्ता तिला घेऊन चालली त्याच्या मस्त गप्पा रंगल्या होत्या. अचानक मुक्ता ओरडली ….आ गया आणि दोघीही रिक्षातून उतरल्या आणि ते ठिकाण बघूनच मिनू अस्वस्थ झाली. पण तिने स्वतःला सावरून पुढे जाऊया म्हणून मुक्ताचा हात पकडला. आणि त्या अनाथ आश्रमात गेल्या. मुक्ताने तेथील मुलांसाठी आणलेले खाऊ व कपडे सर्वांना वाटून दिले. मिनू ही त्या मुलांनसोबत खूप मज्जा करत होती. तितक्यात तिच घड्याळ हातातून पडलं आणि ते एका मुलीने उचलून तिच्या हातात टेकवल त्यावर तिला थोडं वाईट वाटत होतं. ते घड्याळ तिला तिच्या बाबांनी जन्मदिवसाच्या दिवशी दिलेलं होत पण त्यामुलीकडे बघून तिला ते हातात घालण्याची इच्छा झाली नाही.
तिने ते त्या मुलीला दिलं त्यावर ती मुलगी म्हणली नको ताई मला घडयाळ माझ्या आयुष्यातील वेळ च माझ्या पासून हरवली तर हे घड्याळ मी काय करू. त्यावर मिनूने तिला मिठीत घेतलं व खूप रडली व तिला जाणवलं आपल्या आयुष्यात वेळ आहे. घड्याळ पण आहे तरी आपला काटा चुकतोच आहे. तरीही आपण चिडतो एखादं काम सांगितलं की आई बाबा ना बोलतो राग – राग करतो. या मुलीकडे तर काहीच नाही आहे. तरी ती इतकी आनंदी वाटते. यावेळी मिनूला तिच्या अनाथांमधील ती एक सतत खुणावते. आणि सांगते आहे. त्यांची कदर कर गेले ते आठवणीत ठेव आणि काम कर.
असं सांगणारी माझ्या आयुष्यातील नावं माहिती नसणारी अनाथांनधली ती एक होती……
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम