देवळा प्रतिनिधी : तालुक्यातील लक्षवेधी ठरलेल्या वॉर्ड क्रमांक 5 मध्ये जितेंद्र आहेर यांनी दणदणीत विजय संपादन केल्यानंतर त्यांना भाजपा नेतृत्व कोणती जबाबदारी देणार याकडे लक्ष लागून होते. पक्षांतरानंतर जितू अण्णांना फटका बसेल असे तर्कवितर्क लावले जात होते मात्र त्यांनी, सपत्नीक भाजपा प्रवेश करत विजयी पताका कायम ठेवली. त्यांच्या या विजयाने कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले आहे.
जितेंद्र आहेर हे देवळा नगरपंचायतच्या उपनगराध्यक्ष पदी बिनविरोध झाल्याने त्यांच्या ज्येष्ठत्वाला न्याय मिळाल्याचे बघायला मिळाले. भाजप नेतृत्वाने त्यांचा आदरयुक्त सन्मान केल्याने कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
जितेंद्र आहेर हे लोक नेतृत्व असून त्यांचा जनमानसात मोठ्या प्रमाणात मानणारा वर्ग आहे. अभ्यासु व हुशार नेतृत्व असून त्यांचा फायदा विकासात्मक धोरणाला होणार आहे. तालुक्याचा गाडा आता कसा हाकता हे बघणे महत्त्वाचे आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम