नेहा जावळे. (चंद्रपूर)
द पॉईंट नाऊ प्रतिनिधी: भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांच्या विचारांचा अवलंब आपण रोजच्या जीवनात केला तर आपण नक्कीच जीवनात उत्तम लक्ष्य गाठू शकतो तसेच आपली वैचारिक पातळी समृद्ध करू शकतो असा मोलाचा सल्ला अजय बहुउद्देशीय संस्थेच्या सदस्या प्रणिता बोरकर यांनी दिला आहे. आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अजय बहुउद्देशीय संस्था भद्रावतीच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी महामानवाला आदरांजली दिली जाते. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित असतांना प्रणिता बोरकर यांनी आपले मत व्यक्त करत महामानवाला आदरांजली अर्पण केली.
यावेळी संस्थेचे सचिव गौरव बांगडे, महेश शेंडे, प्रणिता बोरकर, वर्षा बोरकर, स्वाती बच्छूवार कार्यक्रमात उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्रीकांत खोडे आणि सातपुते उपस्थित होते. बाबासाहेबांनी आपल्याला जगण्याचा मार्ग सुकर करून दिला, त्यासाठी संविधान या अमूल्य राजपत्राची निर्मिती केली. आपण त्यांच्या सांगितलेल्या विचारांचा अवलंब केला तर नक्कीच आपले जीवन उच्च विचारांनी आणि धेय्यपूर्तीने सफल होईल मात्र आपल्याला हे मिळवण्यासाठी आंबेडकरांना समजणे, जगणे आणि अंगीकारणे गरजेचे आहे असा योग्य उपदेश प्रणिता बोरकर यांनी यावेळी दिला.
संविधान आपल्याला लिहून दिले आहे मात्र आपण त्याची पद्धती आणि विचारशैली आपल्या आचरणात आणली पाहिजे असे मत यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्रीकांत खोडे यांनी मांडले. आपण आपल्या विचारांची दिशा ठरवावी आणि योग्य निर्णय घेऊन मार्ग निवडावा असा सल्ला श्रीकांत खोडे यांनी यावेळी दिला. आजच्या दिनी आपण सगळ्यांनी मिळून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करत त्यांच्या विचारांची धुरा आपण पुढे नेऊ असा संकल्प यावेळी अजय बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा स्वाती धोटकर यांनी केला. आपण विचारांची दिशा उत्तम ठरवली तर आपली पुढची पिढी देखील या विचारांचे पालन करेल आणि हि परंपरा अशीच चालत राहील अशी महत्वाची बाब त्यांनी यावेळी सांगितली.
कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांनी या कार्यक्रमाचे कौतुक करत सगळ्यांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांच्या विचारांचा अवलंब करा असा सल्ला दिला. कार्यक्रमाच्या शेवटी महेश किन्नके यांनी उपस्थितांचे आभार मानले आणि कार्यक्रमाला सांगता दिली.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम