अजब हे सरकार ; कुटुंब नियोजनाच्या किटमध्ये रबरी ‘लिंग’

0
39

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : देशात लोकसंख्या वाढ बघता मोठ्या प्रमाणात वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी यंत्रणा प्रयत्नशील आहे, मात्र महाराष्ट्र सरकारने हद्दच पार केली असून राज्य सरकारकडून कुटुंब नियोजन किटमध्ये रबरी लिंग देण्यात आल्याची धक्कादायक माहिती बुुलढाण्यात समोर आली आहे.

सरकारच्या या निर्णयावर आशा वर्कर (Asha Worker) नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. राज्य सरकारकडून कुटुंब नियोजन किटमध्ये रबरी लिंग देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे आशा वर्कर समोर समस्या उभी झाली आहे. कारण रबरी लिंग प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी समाविष्ट करण्यात आलं आहे. आता ते घेऊन गावात कोणत्या तोंडाने प्रात्यक्षिक करायचे नियोजन काय सांगायचे असे अनेक प्रश्न समोर आले आहेत ? या घटनेनंतर राज्य सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का ? असा संतप्त सवाल नेटकऱ्यांनी केला आहे.

वाढती लोकसंख्या बघता राज्यात लोकसंख्या वाढीवर नियंत्रण मिळवण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात. त्यामध्ये राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून कुटुंब नियोजनाचा उपक्रमही राबवण्यात येतो. मात्र सरकारने या कुटुंब नियोजनाच्या किटमध्ये रबरी लिंग देऊन कर्मचाऱ्यांना पेचात पाडले आहे. प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी हे रबरी लिंग आशा वर्कर्सना देण्यात आले असल्याचं आरोग्य अधिकाऱ्यांकडून ऑफ कॅमेरा सांगण्यात आले आहे. हे असे असल्यास महिलांनी कशी जनजागृती करावी असा प्रश्न उपस्थित रहात आहे.

या संपूर्ण प्रकरणी काही आशा वर्कर महिलांना संताप व्यक्त करत आहेत मात्र समोर येण्यास कोणीही धजावत नाही. विषय संवेदनशील आणि तितकाच खाजगी असल्याने कॅमेऱ्यासमोर येऊन कोणीही बोलायला तयार नाही. या निर्णयावर सरकार फेरविचार होतो का हे बघणे महत्त्वाचे आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here