द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : ओमीक्रॉनच्या वाढत्या प्रभावाने शाळांवर देखील परिणाम होऊ लागला आहे. आता ठाणे येथील शाळा देखील बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ओमीक्रॉनचे रुग्ण दिवसागणिक वाढू लागले आहेत. त्यात मुंबई मध्ये रुग्णांचा वाढता आलेख चिंता वाढवणारा आहे. महाराष्ट्रात आत्ता कुठे शाळा सुरू झाल्या असतांना, अचानकपणे कोरोनाची रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासन सतर्क झाले आहे.
यामुळे आधी मुंबई, नंतर नवी मुंबई आणि आता ठाणे येथील शाळा देखील बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई भागामध्ये रुग्णांची संख्या दिवसाला दोन हजारांच्या वर वाढू लागल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. नागरिकांना काळजी घेण्याचे, नियम पाळण्याचे आवाहन केले जात आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रभावाने आता पुन्हा एकदा निर्बंध वाढवण्यात येऊ लागले आहेत. यामुळे महाराष्ट्राची पुन्हा एकदा लॉकडाऊनकडे वाटचाल सुरू झाल्याचे संकेत मिळत आहेत.
राज्य सरकारमधील वेगवेगळ्या मंत्र्यांनी लॉकडाऊन बाबत सूचक विधाने केल्याने, लॉकडाऊन होणार याचे स्पष्ट संकेत मिळू लागले आहेत.
शाळा सुरू झाल्या आहेत. शाळांमध्ये कोरोनाच्या प्रभावाला आयते पाठबळ मिळू नये, या अनुषंगाने ठाणे येथे सर्व शाळा आता 31 जानेवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम