अखेर त्या विकृताला झाली अटक

0
44

द पॉईंट नाऊ ब्युरो ;भारतीय संघाचा पूर्व कर्णधार विराट कोहली  (Virat Kohali) याच्या मुलीवर बलात्काराची धमकी देणाऱ्याला अटक करण्यात आली आहे.

भारतीय संघ (IndianTeam) हा सध्या सुरू असलेल्या T – 20 वर्ल्ड कप (World Cup) स्पर्धेतील सर्वात फेव्हरेट संघ म्हणून गणला जात होता. मात्र संघाचे या स्पर्धेत प्रदर्शन अतिशय निराशाजनक राहिले. आणि भारतीय संघ उपांत्य फेरीच्या (Semi Final) आधीच स्पर्धे बाहेर पडला.

याचे पडसाद संपूर्ण भारत (India) भर उमटले. भारतीय संघा बाबत सर्व स्तरातून नाराजी व्यक्त केली गेली.

यातच विकृतीचा कळस म्हणजे भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या 9 महिन्यांच्या मुलीवर (9 Month Child) बलात्कार करण्याची धमकी एका विकृताने सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून दिली.

याच विकृतास हैदराबाद (Hyderabad) येथून पोलिसांनी (Police) अटक केली आहे. संबंधित व्यक्ती हा इंजिनिअर (Engineer) असल्याचं सांगण्यात येत आहे. रामनागेश अलिबथिनी असं संबंधित आरोपीचं नाव आहे.

भारतात क्रिकेट खेळाबाबत मोठ्या अपेक्षा असणारा चाहता वर्ग (Cricket Fans) आहे. या वर्ल्ड कप मध्ये देखील भारतीय संघाकडून मोठ्या अपेक्षा चाहत्यांनी ठेवल्या होत्या. मात्र निराशाजनक कामगिरीने सर्व चाहते नाराज होते. आणि त्यात या प्रकारे विकृती देखील दिसून आली.

भारतीय संघ वर्ल्ड कप इतिहासात (World Cup History) पहिल्यांदा पाकिस्तान (Pakistan)कडून पराभूत झाला. आणि सगळीकडे भारतीय संघावर टीकेची झोड उठली. गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammad Shani) याच्यावर देखील वेग वेगळे आरोप करण्यात आले. मात्र सर्व आजी – माजी खेळाडू त्याच्या पाठीशी उभे राहिले.

तर कर्णधार विराट कोहली याच्या वर देखील मोठ्या प्रमाणावर टीका झाली. त्यात त्याच्या मुलीवर बलात्काराची धमकी दिल्यानंतर जगभरातील खेळाडूंनी देखील या गोष्टी बाबत संताप व्यक्त केला.

कोणत्याही खेळाडूच्या नेतृत्वाबाबत, खेळाबाबत तुम्ही टीका करू शकता, मात्र त्याच्या कुटुंबाला यामध्ये आणण्याचा कोणालाही अधिकार नाही, म्हणून सर्व विराटच्या पाठीशी उभे राहिले.

तसेच याबाबत महिला आयोगाने देखील दखल घेत, पोलिसांना संबंधितावर कारवाई करण्याच्या सूचना केल्या होत्या. आता या संबंधित आरोपीस अटक करण्यात आली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here