द पॉईंट नाऊ ब्युरो : मालेगावच्या सोयगाव येथील चोरी प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आली आहे.
मालेगावच्या सोयगाव येथे 18 डिसेंबर रोजी अमृतलाल पटेल या व्यापाऱ्याच्या दुचाकीच्या डिकीमधून चोरट्यांनी 11 लाख रुपये रक्कम असलेली पिशवी चोरून नेली होती. यामुळे मोठी खळबळ उडाली होती.
त्यानंतर पोलिसांनी तपास सत्र सुरू केल्यावर नुकतेच मिळालेल्या माहितीनुसार नाशिक येथील लॉजमधून कल्पेश जोशी या धुळे येथील संशयितास अटक केली. त्याची कसून चौकशी केली असता, यात अजून दोन संशयित सामील असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी धुळे येथून निखिल अहिरे यास अटक केली आहे. यातील तिसरा संशयित हा विधिसंघरशित बालक असल्याचे सांगण्यात येत आहे.
या संशयितांकडून पोलिसांनी दीड लाखांहून अधिक रक्कम आणि दुचाकी जप्त केली आहे. या प्रकरणी कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम