नाशिक प्रतिनिधी : कोविड मुळे अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे विद्यार्थ्यांना पास करण्यात आले. सध्या विद्यार्थ्यांची ऍडमिशन साठी तोबा गर्दी झाली असून.अकरावी प्रवेशासाठी पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. शनिवारी सायंकाळपर्यंत चार हजार 638 अर्ज दाखल झाले आहेत. अकरावी प्रवेशासाठी आर्ट्स, कॉमर्स, सायन्स मिळून 24 हजार 750 जागा उपलब्ध आहेत.
न्यायालयाच्या आदेशानुसार यंदा अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेण्यात येणार होती. ती रद्द करण्यात आली आहे. यामुळे कालपासून अकरावी प्रवेशासाठी नोंदणी सुरू करण्यात आली आहे. 11 वीच्या मार्क्स नुसार प्रवेश दिला जाणार आहे. शालेय शिक्षण विभागातर्फे राज्यातील प्रमुख महापालिका हद्दींमध्ये केंद्रिभूत ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविली जाते. यात नाशिक महापालिकेचाही समावेश आहे. यावर्षी विद्यार्थी संख्या मोठ्या प्रमाणात असणार आहे.
अकरावी प्रवेशाकरिता अर्जाचा भाग एक भरण्याची प्रक्रिया शनिवारी (ता.14 ) सुरू झाली. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सायंकाळी सातपर्यंत चार हजार 638 विद्यार्थ्यांची संकेतस्थळावर नोंदणी झाली होती. दोन हजार 266 अर्ज लॉक केलेले आहेत. एक हजार 104 विद्यार्थ्यांच्या अर्जाची पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
मंगळवारपासून भाग दोन नाशिक महापालिका क्षेत्रातील 58 कनिष्ठ महाविद्यालयांत विविध शाखांच्या 24 हजार 750 जागा उपलब्ध आहेत. अर्ज दाखल करण्यासाठी 22 ऑगस्टपर्यंत मुदत आहे.
मंगळवार पासून अर्जाचा भाग दोन भरता येणार आहे. याअंतर्गत विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी शाखा, कनिष्ठ महाविद्यालयांचा प्राधान्यक्रम नोंदविता येईल.
असे असेल वेळापत्रक
23 ऑगस्टला तात्पुरती गुणवत्तायादी जाहीर केली जाईल. यादीसंदर्भातील हरकती, तक्रार नोंदविण्याकरिता 24 ऑगस्टच्या सायंकाळी पाचपर्यंत वेळ उपलब्ध असेल. 25 ऑगस्टला सामान्य गुणवत्ता यादी जाहीर होईल.
25 व 26 ऑगस्ट असे दोन दिवस माहिती प्रक्रियेसाठी राखीव ठेवले आहेत. 27 ऑगस्टला पहिल्या फेरीतील गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल. या यादीतील विद्यार्थ्यांना 30 ऑगस्टपर्यंत प्रवेशाची मुदत असेल. यामुळे यंदा विद्यार्थ्यांची स्पर्धा वाढणार आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम