अंबासन येथे क्रांतिसूर्य महात्मा फुले जयंती साजरी

0
40

स्वप्निल अहिरे,
आराइ प्रतिनिधी : बागलाण तालुक्यातील अंबासन एक छोटेसे गाव परंतु त्याचा आदर्श घ्यावा तेवढा कमीच. इथले तरुण किती जिद्दी त्यांचा खरोखर आदर्श घेण्यासारखा आहे. सकाळी ०८:०० वाजता सावता महाराज मंदिराजवळ महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त चौकातील पुतळ्याचे प्रतिमा पूजन करण्यात आले.कुठलाही अवास्तव खर्च न करता समाजापुढे आदर्श निर्माण कसा करता येईल याचा सारासार विचार करून महात्मा फुले प्रतिष्ठान यांच्या वतीने रात्री ०८:०० वाजता सावता महाराज चौकात प्राध्यापक जावेद शेख यांचे थोर पुरुषांच्या जीवनावर आधारीत व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांचे शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच आराई येथील पत्रकार स्वप्निल अहिरे यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. व्याख्यानात सुरुवातीस ज्या थोर मातांनी आपले जीवन जनतेसाठी वाहून दिले त्यांना व सर्व थोर महा पुरुषांना वंदन करून प्रा.शेख यांनी महात्मा फुलेंचा संपूर्ण जीवनपट आपल्या व्याख्यानात सांगतानाच स्वराज्याचे शिल्पकार छत्रपती शिवाजी महाराज तसेच स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल ही सांगण्यास विसरले नाहीत.

आपल्या व्याख्यानात त्यांनी संतांचे वांग्मय अगदी सिद्धांत देऊन सांगितले. कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत मंडपातील गर्दी होती तशीच राहिली कुणीही आपली जागा सोडली नाही. सर्वजण अगदी मनापासून व्याख्यानात दंग झाले होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित तरुणांचे आभार मानताना खरोखर मला अभिमान आहे की, माझे अंबासन सारख्या पुण्यनगरीत व्याख्यानाचा योग आला. जेथील तरुणांनी अगदी कमी दिवसात तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यात नसेल अशा छत्रपतीं शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारला खरंच मी त्यांच्यापुढे नतमस्तक होतो असे प्रतिपादन केले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुखदेव अहिरे,सखाराम अहिरे , एम.पी.अहिरे ,श्रीराम अहिरे ,उजेंद्र अहिरे ,प्रविण बागुल,प्रविण अहिरे, सुदर्शन अहिरे ,लहू अहिरे रणजित अहिरे,महेंद्र अहिरे,नरेंद्र अहिरे, केदा अहिरे, रवींद्र अहिरे, शामकांत अहिरे, निवृत्ती बागुल, सुनील अहिरे, प्रशांत अहिरे, गणपत अहिरे, नाना अहिरे, चंद्रशेखर अहिरे, प्रविण अहिरे, बाळकृष्ण कोर, नितीन कोर, हेमंत कोर, एकनाथ कोर,सुनील कोर आदींसह ग्राम पंचायत कार्यकारणी यांनी प्रयत्न केले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here