अंथरुणात दोन साप आढळल्याने बालिकेचा मृत्यू

0
20

द पॉंईंट नाऊ प्रतिनिधी : रात्री आईजवळ झोपलेली मुलगी सकाळी उठणार नाही आणि ती झोपेतच गेली असे कळले, असा प्रसंग कोणत्या आईवर ओढावला तर त्या आईच्या काळजाचं काय होईल असा विचार करून देखील अंगावर काटा येतो मात्र अशी घटना भोकरी (ता. पाचोरा) येथील अलिजा इमरान काकर यांच्या घरी घडली आहे. चार वर्षीय अलिजा आईसोबत झोपलेली असताना अंथरुणातच विषारी सर्पाने दंश केला. रात्री कुशीत येवून झोपलेली चिमुकली आपल्‍याला सोडून जाईल; याचा विचार देखील आईला करवत नाही. चिमुकलीच्‍या मृत्यूने निशब्‍द झालेल्‍या आईच्‍या डोळ्यातून अश्रूंच्‍या धारा वाहत आहे. या प्रकाराने वरखेडी व भोकरी गावावर शोककळा पसरली.

आईसोबत घरात झोपली असताना सोमवारी (ता. १५) पहाटे काहीतरी चावल्याने ती जागी झाली. तिने आईला सांगितल्यावर आई– वडिलांनी उठून बघितले असता अलिजा झोपलेल्या अंथरुणावर दोन सर्प दिसले. त्यापैकी एकाने अलिजाच्या गळ्याजवळ दंश केला होता. तिला उपचारासाठी दवाखान्‍यात नेले. परंतु उपचार सुरू असतानाच अलिजाचा मृत्यू झाला. यामुळे संपूर्ण गावात गावात हळहळ व्यक्त होत आहे.

रात्री आईजवळ अंथरूणात चार वर्षीय बालिका झोपली होती. परंतु, पहाटेच आईच्‍या कुशीत रडणारी बालिका काही क्षणातच आई व परिवारापासून दूर गेली. या प्रकाराने संपुर्ण परिवार निशब्‍द झाला आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here