देवळा ; येथील अंगणवाडी सेविका जयश्री संतोष गुजरे यांना राज्य स्तरीय नारी शक्ती पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले , मनुष्यबळ विकास अकादमी तर्फे नाशिक येथे नुकतेच राज्य स्तरीय गुणीजन गौरव महासंमेलन संपन्न झाले .

या महासंमेलनात देवळा येथील अंगणवाडी सेविका जयश्री गुजरे यांना इंटर नॅशनल टॅलेंट आयकॉन डॉ . जयलक्ष्मी सानिपीना राव, जेष्ठ साहित्यीक रमेश आव्हाड व संस्थेचे अध्यक्ष कृष्णाजी जगदाळे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले . याबद्दल अंगणवाडी सेविका गुजरे यांचे येथील एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी जयश्री नाईक , मुख्य सेविका कल्याणी चव्हाण , सहारे ,आहेर आदींसह अंगणवाडी सेविका ,मदतनीस आदींनी अभिनंदन केले आहे .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम